कोरोना व साथीचे रोग, हा डबल धमाका परवडणारा नाही – मंगेश पाटील
पालिकेला सज्ज राहण्याचा इशारा
कोपरगाव :
करोनाबाधित रुग्ण आढळल्याने सर्वसामान्यांमध्ये घबराट आणि चिंतेचे वातावरण आहे. त्यात शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने चांगल्या प्रकारचा पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा स्थितीत साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा संभाव्य धोका लक्षात घ्या, कारण आज कोरोना व साथीचे रोग, हा डबल धमाका कोपरगावकरांना पचणारा व परवडणारा नाही तेंव्हा पालिकेने मुकाबल्यासाठी सज्ज राहावे असा इशारा माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी दिला आहे .
शहरात टप्प्याटप्प्याने का होईना दोन ते तीन तीन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे.अनेक प्रभागात साचलेली पाण्याची डबकी, डास व माश्यांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आतापर्यंत अनेक प्रभागातून दोन वेळा औषध फवारणी करण्याची गरज होती. पण दुर्दैवाने ती आजपर्यंत झाली नाही. डासांमुळे मलेरिया , डेंग्यू , फ्लू , ताप , टायफाईड अतिसार हगवण आदी इतर आजार फैलावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तेंव्हा या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी औषध आणि धूर फवारणी तातडीने करावी, कारण एकीकडे कोरोना व दुसरीकडे साथीचे रोग सुरू झाले या डबल धमाका यामुळे तर ही परिस्थिती सावरणे पालिकेच्या हाताबाहेर जाईल, अजून परिस्थिती हातात आहे वेळीच काळजी घ्या, तातडीने फवारण्या करा, कचराकुंड्या साफ करा, स्वच्छता ठेवा, धुराडे फिरवा, गटारावर पावडर टाका, पाणी साचलेल्या ठिकाणाचे पाण्याचा निचरा करा, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा, अशा सूचना करून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे जाहीर आवाहन कोपरगाव नगरपालिका प्रशासनाला माजी नगराध्यक्ष मंगेश पाटीलयांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे .
चौकट
कोरोनामुळे लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. हा टप्पा स्फोटक व महत्त्वाचा आहे. त्यात पडणारा पाऊस ढगाळ हवामान वातावरणात निर्माण झालेली आद्रता आहे हे वातावरण आधीच कोरोनासारख्या आजाराला पोषक आहे. त्यात कोरोनामुळे व्यापार, दुकाने, दवाखाने सर्वकाही अर्धवट सुरू आहे. अशा परिस्थितीत योग्य उपचार मिळणे अडचणीचे आहे केव्हा आज तरी साथीच्या आजारांचा फैलाव होणे मोठे महागात पडू शकते याची दखल पालिका प्रशासनाने घेतली पाहिजे.