अविश्वासाची हार ! काळेंचे थोरातच सरपंच, तालुक्यात पहिल्यांदाच अविश्वासांवर मतदान

अविश्वासाची हार ! काळेंचे थोरातच सरपंच, तालुक्यात पहिल्यांदाच अविश्वासांवर मतदान

Defeat of disbelief! Thorat Sarpanch of Kale, voting on no-confidence for the first time in the taluka

 कोपरगाव : तालुक्यातील जवळके ग्रामपंचायतीचे थेट जनतेतून निवडून आलेल्या काळे गटाचे सरपंच बाबुराव थोरात यांच्यावर विरोधकांनी आणलेला अविश्वासाची हार झाल्यानं काळेंचे थोरातच सरपंच, तालुक्यात पहिल्यांदाच अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले होते.

थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंच यांच्याविरुद्ध सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर मात्र प्रशासनाला मतदान घ्यावे लागले सरपंच बाबुराव थोरात यांनी हा ठराव पाच विरुद्ध तीन मतांनी जिंकत आपले सरपंचपद अबाधित ठेवल्याने विरोधकांना तोंडघशी पडावे लागले .

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायतीच्या ३ वर्षापूर्वी पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे काळे गटाचे बाबुराव कारभारी थोरात हे जनतेतून सरपंच म्हणून निवडून आले होते. यामध्ये काळे गट ३, शिवसेना गट १, भाजप १, सत्यशोधक पॅनलचे ३ असे एकूण ८ सदस्य निवडून आले होते. आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळके गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच बाबुराव थोरात यांनी जवळके गावात रस्ते, शाळा खोल्या, शाळेसाठी संरक्षक कम्पाऊंड, तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीसाठी निधी मंजूर करून जवळके गावात अनेक विकास कामे केली आहेत. मात्र विरोधकांना होत असलेली विकासकामे सहन न झाल्यामुळे त्यांनी काही सदस्यांना आमिष दाखवून विद्यमान सरपंच बाबुराव थोरात यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता. याबाबत सोमवार (दि.१२) रोजी घेण्यात आलेल्या मतदानात सरपंच बाबुराव थोरात यांच्या बाजूने तीन व विरोधकांच्या बाजूने पाच मतदान पडले. त्यामुळे सरपंच बाबुराव थोरात यांनी अविश्वास ठराव जिंकून आपले सरपंच पद अबाधित ठेवल ठेवल्याने विरोधकांवर डाव फसल्याची नामुष्की ओढावली आहे . अविश्वास ठराव जिंकताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी व मंडल अधिकारी बाबा जेडगुले यांनी काम पाहिले त्यांना तलाठी सानप एम.आर. व ग्रामसेवक श्रीमती ए. ई. शेलार यांनी सहकार्य केले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page