संजीवनीच्या संकेतची कॅनडा विद्यापीठात इंटर्नशिपसाठी निवड – अमित कोल्हे
Signs of Revitalization Selection for Internship at University of Canada – Amit Kolhe संजीवनी इंटरनॅशनलचे यश Success of Sanjeevani International
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 12April 2021, 18:00 :00
कोपरगांव: संजीवनी अभियांत्रिकी तृतिय वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील संकेत सुरेश इंगळे याची कॅनडा सरकारच्या मिटॅक्स ग्लोबलिंक रिसर्च इंटर्नशिप्स या संस्थेमार्फत कॅनडामधिल ओंटॅरिओ प्रांतातील युनिव्हर्सिटी ऑफ विंडसोर मध्ये ३ महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी (अंतर्वासिता) निवड झाली आहे. या कालावधीमध्ये त्याला रू ५ लाखांचे स्टायपेंडही मिळणार आहे. महाराष्ट्रातून निवड झालेल्या ४ विद्यार्थ्यांपैकी संकेत हा एकमेव ग्रामीण भागातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
अमित कोल्हे म्हणाले की, आखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई), नवी दिल्ली या संस्थेने कॅनडा सरकारच्या मिटॅक्स ग्लोबलिंक रिसर्च इंटर्नशिप्स या संस्थेबरोबर सामंजस्स करार (एमओयु) केला आहे. भारतातील पन्नास विद्यार्थ्यांत चालु वर्षी महाराष्ट्रातील फक्त ४ विध्यार्थ्यांचा या निवडीमध्ये समावेश आहे. यात संजीवनीच्या संकेतने निवडीमध्ये बाजीमारून संजीवनीच्या वैभवात भर घातली. यावर्षी कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे तेथिल विद्यापीठातील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्हर्चुअल पध्दतीने इंटर्नशिप करावी लागणार आहे. संकेतला ‘फ्लो पास्ट ब्रीज पायर्स अँड स्कौर’ या विषयावर येथे राहुनच संशोधन करायचे आहे, मात्र व्हर्चुअल पध्दतीने त्याला तेथिल प्रयोगशाळांचाही वापर करायचा आहे. संकेतच्या या राष्ट्रीय पातळीवरील यशाबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी संकेत व त्याच्या आई वडीलांचे अभिनंदन करून त्याच्या संशोधन कार्यास शुभेेच्छा दिल्या. अमित कोल्हे यांनीही संकेतचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी टेक्निकल ऑफिसर विजय नायडू, डायरेक्टर डाॅ. ए.जी. ठाकुर, विभाग प्रमुख डाॅ. मच्छिंद्र पुरकर, मार्गदर्शक डाॅ. महेंद्र गवळी उपस्थित होते.