निर्दयी पती व सासूने दिले पैशासाठी पत्नीला चटके! दोघाविरूध्द गुन्हा दाखल  

निर्दयी पती व सासूने दिले पैशासाठी पत्नीला चटके! दोघाविरूध्द गुन्हा दाखल

Cruel husband and mother-in-law slap wife for money! Filed a crime against both

कोपरगाव तालुका पोलिसांकडून भुसावळ तालुका पोलिसांकडे गुन्हा वर्गCrime class from Kopargaon taluka police to Bhusawal taluka police

 कोपरगाव : तालुक्यातील सोनेवाडी येथे राहत असलेल्या पत्नीला नातेवाइकांकडून लग्नात खर्च झालेले ५०००० घेऊ नये अशी मागणी करून निर्दयी पती व सासू या दोघांनीही पत्नीला बेदम मारहाण करून चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार पानकुरा भुसावळ जिल्हा जळगाव येथे घडला आहे. कोपरगाव तालुका पोलिसांनी सदरचा गुन्हा भुसावळ तालुका पोलिस स्टेशन यांना वर्ग केला आहे.

दरम्यान, कोपरगाव तालुका पोलिसांना ८ एप्रिल रोजी सायंकाळी ५.२७ वाजता भानपुरा भुसावळ जिल्हा जळगाव येथील घटना घडली असल्याचे फिर्यादी सौ. सविता हेमंत ठाकरे (२२) हल्ली राहणार सोनेवाडी तालुका कोपरगाव यांनी कळविले की पती हेमंत रमेश ठाकरे व सासू लताबाई रमेश ठाकरे रा. पानकुरा भुसावळ जिल्हा जळगाव यांनी तुझ्या नातेवाईकांकडून लग्नाचा खर्च झालेले ५० हजार रुपये घेऊन ये, तुला मूलबाळ होत नाही, स्वयंपाक येत नाही, घरात काम जमत नाही, असे म्हणून नेहमी आडून पाडून बोलून लाथाबुक्क्यांनी काठीने मारहाण करून दुखापत केली तसेच ९ एप्रिलला रोजी उलटनी गॅस वर तापवुन माझ्या तोंडावर ओठावर पोटावर मला क्रूर वागणूक दिली वगैरे फिर्यादीवरून पती व सासू विरोधात गु.र.न.व कलम-l फस्ट१०९/२०२१ भा. द. वी.४९८अ ३२४,३२३,५०४,३४ प्रमाणे तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे. पुढे तपासी अधिकारी सहाय्यक फौजदार कुसारे यांनी भुसावळ तालुका पोलिस स्टेशन यांना वर्ग केला आहे. 

Leave a Reply

You cannot copy content of this page