इनोव्हा गाडीतून गाय पळविली; कोपरगाव परिसरातील प्रकार

इनोव्हा गाडीतून गाय पळविली; कोपरगाव परिसरातील प्रकार

Inova snatched the cow from the car; Types in Kopargaon area

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 13April 2021, 14:00 :00

कोपरगाव : घरासमोर झाडाला बांधलेली खिलार शिंगाची पांढरी गाय इनोव्हा या चारचाकी गाडीतून लांबविल्याची धक्कादायक प्रकार कोपरगाव शहर परिसरात मध्यरात्री ३.३० वाजेच्या सुमारास घडला.

याबाबत सह्याद्री कॉलनीत राहत असलेले जनार्दन जगन्नाथ गायकवाड यांनी सांगितले कि, ९ एप्रिल रोजी रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास इनोव्हा कंपनीचा चारचाकी गाडीत तीन ते चार जण गाय टाकत असल्याचे त्यांनी बघितले असल्याचे सांगितले. उमेश नानासाहेब नाईक रा. नाईक नगर परिसरात राहातो. गेल्या दहा वर्षापासून माझ्याकडे दोन गावरान गाई आहेत व एक वासरू आहे. सर्व गुरे मी घरासमोरील झाडाला बांधतो. गुरुवारी ८ एप्रिलला रात्री साडेअकरा वाजता आम्ही जेवण करून झोपलो तेव्हा दोन्ही गाई व वासरू बांधलेले होते मात्र शुक्रवारी ९एप्रिलला सकाळी साडेसहा वाजता उठलो तेंव्हा मला दोन गाई पैकी खिलार शिंगे असलेली पांढरी गाय दिसून आली नाही म्हणून मी तिचा शोध घेतला सह्याद्री कॉलनीतील गायकवाड यांनी मला वरील प्रमाणे हकीगत सांगितली, तरीही सगळीकडे गाईंचा शोध घेतला पण ती सापडली नाही, शोध देत असता तेरा बंगले परिसरात राहणारे शेख साजिद जमशेद यांनी आपल्या ही दोन गायी चोरी गेले असल्याचे सांगितले. दरम्यान बांधलेली एक गाय व वासरू सुरक्षित राहिल्याचेही नाईक यांनी सांगितले. नाईक यांनी त्यांची खिलार शिंगे असलेली दहा वर्षाची दहा हजार रुपये किमतीची पांढरी गाय चोरीला गेल्याची तक्रार कोपरगाव पोलिसात दिली आहे. सदर तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल ३९१ आर. पी. पुंड हे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान या परिसरात अनेकदा गुरे चोरीच्या घडतात मात्र पोलिसात तक्रार देवूनही गुरे पुन्हा परत मिळाली नाही, त्यामुळे अनेक जण तक्रार देणेही टाळत असल्याचे येथील पशुपालकांनी सांगितले. तर या गुरे चोरणारी टोळी एकच असल्याची शक्यताही व्यक्त केली असून टोळीचा शोध लावावा, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page