पुरणपोळीने पाडवा गोड करून विवेक कोल्हे यांनी त्यांच्याशी सवांद साधला
Vivek Kolhe sweetened Padva with Puranpoli and talked to him
औषधे, सिलेंडर आणि ऑक्सिजन मशीन उपलब्ध दिले Medicines, cylinders and oxygen machines providedः
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 13April 2021, 19:30 :00
कोपरगाव : नववर्षारंभदिनी गुढीपाडवा या सणावर कोरोनाचे सावट दिसुन आले.या पार्श्वभूमीवर जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक विवेक कोल्हें यांनी कोपरगाव येथील कोविड सेंटरला भेट दिली. व पुरणपोळीचे जेवण देऊन कोरोना रुग्णांचा पाडवा गोड करून त्यांच्याशी सवांद साधला व त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. व जागेवरच निर्णय घेत कमी पडत असलेले औषधे, सिलेंडर आणि ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून दिले.
यावेळी श्री कोल्हे म्हणाले, आज महाराष्ट्रासह कोपरगाव तालुक्यातही रूग्णांची वाढती संख्या चिंताजनक असली तरीही या संकटाला घाबरून न जाता एक कुटूंब म्हणून सर्वजण एकजुटीने सामोरे जावू, व यातून लवकरच बाहेर पडू, असा धीर दिला. तालुक्याच्या प्रत्येक संकटात संजीवनी उदयोग समूह नेहमीच मदतीला धावून आला आहे. अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी कोरोना महामारीच्या सुरूवातीपासून नागरीकांच्या सुरक्षितेसाठी विविध उपक्रम राबविले आहे. कोरोना आजारापासून बचाव होण्यासाठी नागरीकांना मास्क,सॅनिटायझर आदीसह सुरक्षिततेच्या साहित्याचा पुरवठा करत नागरीकांना लसीकरणासाठी मोलाची मदत करीत आहे.
गेल्या वर्षभरापासून या प्रसंगाला सामोरे जात असतांना येणा-या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचेमुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,आरोग्यमंत्री,
महसूलमंत्री, ग्रामविकास तथा पालकमंत्री, जिल्हाधिकारी, तहसिलदार तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
रूग्णांना तुटवडा जाणवत असलेल्या औषधांचा तातडीने पुरवठा करण्यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार राजेंद्र शिंगणे यांचेशी संपर्क करून औषधे उपलब्ध करून देण्याची त्यांनी मागणी केली असल्याचे विवेक कोल्हे यांनी सांगितले. वयावेळी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, गटनेते रविंद्र पाठक, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दत्ता काले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक,शिवाजी खांडेकर, जनार्धन कदम ,रविंद्र रोहमारे, सागर जाधव, प्रमोद नरोडे, दिपक जपे, वैभव गिरमे, जगदीश मोरे, शुभम काळे उपस्थित होते. यावेळी विवेक कोल्हे कोविड सेंटरला प्रतिकूल परिस्थितीमध्ये नागरीकांना सुविधा देत असल्याबददल येथे काम करत असलेल्या वैदयकिय अधिकारी व कर्मचा-यांशी संवाद साधत त्यांचे अभिनंदन केले.