कोपरगावचा लोकसहभागातील ऑक्सीजन प्लॉंट तूर्तास बरगळला – वहाडणे

कोपरगावचा लोकसहभागातील ऑक्सीजन प्लॉंट तूर्तास बरगळला – वहाडणे

Kopargaon’s Oxygen Plant Stop  in Public Participation

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 8May 2021, 14:20 :00

 कोपरगाव : “ऑक्सिजन प्लान्ट” उभारणीस सर्वत्र मागणी असल्यामुळे किमान चार महिने तरी ऑक्सिजन प्लॉंट उभारून देता येणार नाही, असे म्हणत ऑक्सीजन प्लांट कंपन्यांनी हात वरती केल्यामुळे कोपरगाव शहरातील लोकसहभागातून ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात येणारा ऑक्सिजन प्लॉंट वेळेअभावी तूर्तास बरगळला असल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे .

ऑक्सिजनचा झालेला प्रचंड तुटवडा कमी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असेच सर्वांनी यावेळी मांडले होते. कारण ऑक्सिजनअभावी होत असलेले मृत्यु रोखणे महत्वाचे आहे. शहरात लोकसहभागातून एक ऑक्सिजन प्लान्ट ग्रामीण रुग्णालयात बसविण्याबाबत चर्चा करण्यासाठी सहविचार सभा नुकतीच नगरपरिषदेत पार पडली होती. ५० ते ६० लाख रू. गुंतवणूक करून ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यासाठी आर्थिक भार उचलण्याचे अनेकांनी मान्यही केले. पण त्यानंतर अरविंदशेठ भन्साळी, राजेश ठोळे, काकासाहेब कोयटे यांनी अनेक राज्यातील “ऑक्सिजन प्लान्ट” निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क केला असता अजून किमान चार महिने तरी ऑक्सिजन प्लान्ट उभारून देता येणार नाही, कारण सर्व देशभरातूनच अशा प्लान्टला प्रचंड मागणी आहे असेच सांगण्यात आले. आ. आशुतोष काळे यांनीही एका नविन ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याची ऑर्डर दिल्याचे सांगितले. तो उभारल्यानंतर येणाऱ्या काळात ऑक्सिजनची सोय होणार आहे. त्यामुळे सध्या तरी लोकसहभागातून ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याचा विषय थांबविलेला आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page