तिसरी लाट; रुग्णसेवेत कमतरता आढळल्यास गय नाही -आ. आशुतोष काळे
The third wave; If there is a lack of patient care, it will not go away. Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 9May 2021, 15:00 :00
कोपरगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य विभागाच्या सर्व अडचणी सोडविल्या जात आहेत. माझा मतदार संघ हेच माझे कुटुंब आहे. प्रत्येक बाधित रुग्ण हे माझ्या परिवारातील सदस्य आहेत. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना जास्त प्रमाणात बाधा होण्याचा संभव असल्याने गांभीर्याने घेत त्यामुळे प्रशासनाच्या कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांकडून रुग्णसेवेत कमतरता आढळून आल्यास त्यांची गय केली जाणार नाही असा ,स्पष्ट ईशारा आ. आशुतोष काळे यांनी तिसऱ्या लाटेच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत आरोग्य विभाग व प्रशासनाला दिला.
आ. आशुतोष काळे म्हणाले की, दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार उडाला असून २० ते ५० वयोगटातील हजारो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून अजूनही या लाटेची तीव्रता कायम आहे. तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना आहे. त्यामुळे आरोग्य विभाग व प्रशासनाने अजिबात गाफील राहून चालणार नाही अशा सूचना दिल्या. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या शासनाच्या सूचनांप्रमाणे काय उपाय योजना बाबत माहिती घेतली. या बैठकीसाठी बालरोग तज्ञांना पाचारण करून त्यांच्याकडून लहान मुलांना कोरोनाची बाधा होवू नये यासाठी पालकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याची माहिती जाणून घेतली. संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी योग्य नियोजन करून स्वतंत्र व्यवस्था निर्माण करा. त्यासाठी सर्वोतोपरी मदत करू बालरोग तज्ञांची समिती स्थापन करून जगजागृती केली जाणार आहे. तरीदेखील सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घेवून शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे व कोरोनाची बाधा जरी झाली तरी घाबरून न जाता आपल्या परिवारातील इतरांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे असे नागरिकांना आवाहन केले आहे. आरोग्य विभागाने जेष्ठ नागरिकांना लसीचा दुसरा डोस व १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यासाठी लसीकरण मोहीम राबवितांना योग्य नियोजन करा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी आरोग्य विभाग व प्रशासनाला दिल्या. यावेळी बैठकीस तहसीलदार योगेश चंद्रे, अधिकारी, डॉक्टर, विविध पदाधिकारी आदी उपस्थित होते.





