मराठा आरक्षण गांभीर्याने घ्या, अन्यथा मराठा समाजाकडून माफी नाही – सौ. स्नेहलता कोल्हे
राज्य सरकारविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया
कोपरगाव
आरक्षणाचा लढा कोर्टात सुरू असून,
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्यभर तापला आहे.आघाडी सरकारने मराठा आरक्ष आरक्षणाचा विषय गांभीर्याने घ्यावा, अन्यथा मराठा समाज माफ करणार नाही. अशी तीव्र प्रतिक्रीया भाजप प्रदेश सचिव, माजी आ. सौ स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केली.
मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला होता, कॉग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात त्रुटी ठेवून सातत्याने प्रलंबित ठेवण्याचे काम झाले. परंतू मराठा आरक्षणाचा विषय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसमोर येताच त्यांनी समाज बांधवांना दिलेल्या शब्दाप्रमाणे मराठा आरक्षणाचा विषय अंतिम टप्प्यात नेला. या निर्णयाचे देखील मराठा समाज बांधवानी स्वागत केले होते. सरकार बदलताच मराठा आरक्षणाचा विषय पुर्ण करून घेण्याची जबाबदारी राज्यातील आघाडी सरकारची असल्याने त्यांनी यासाठी विशेष नियोजन केले पाहिजे परंतू आजपर्यंत या सरकारकडून कोणत्याही प्रकारचे गांभीर्य घेतलेले दिसत नाही. त्यामुळे याप्रश्नी सरकारची अनास्था जनतेला समजली आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात मराठा आरक्षणाचा विषय हाताळतांना अनेकांनी राजकीय भांडवल करून खोडा घालण्याचा प्रयत्न केला, परंतू न डगमगता कोणतेही पाऊल मागे न घेता मराठा आरक्षणाचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती भुमिका बजावली. त्याच पध्दतीची भुमिका या राज्यसरकारची आहे, लाखो विद्याथ्र्यांचे
शैक्षणिक भवितव्य आणि रोजगाराचा प्रश्न आरक्षणावर अवलंबून आहे. त्यामुळे या ऐतिहासिक अशा आरक्षणाच्या निर्णयाला सकारात्मक भुमिका ठेवून न्यायालयात टिकविण्याचे काम सरकारने करावे, परंतू राज्य सरकारला यामध्ये कोणतेही स्वारस्य दिसत नाही. मराठा समाजाच्या भावनांशी खेळण्यापेक्षा हा प्रश्न गांभीर्याने घेऊन आघाडी सरकारने आरक्षण टिकण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी पुर्ण कराव्यात व या आरक्षणाला वाचविण्याचे काम करावे,अन्यथा जनता या राज्य सरकारला कधीच माफ करणार नाही याचा पुनरुच्चार भाजप प्रदेश सचिव सौ. कोल्हे यांनी केला.