Corona Vaccine: कोपरगावात सुपरफास्ट लसीकरण; दिवसाला ४४४ लोकांना लस,
Corona Vaccine: Superfast vaccination in Kopargaon; Vaccinate 444 people a day
आतापर्यंत कोपरगावातील ३३ हजार २९८ लोकांचे लसीकरण यात कोविशिल्ड २८ हजार ४६३ लोकांना तर कोवॉक्सीन ४ हजार ४७२ अशी १२.५ % लोकांना लस देण्यात आली आहे.यात ग्रामीण भागातील १९०९९ लोकांना तर शहरी भागात१४ हजार १९९ लोकांनी लस घेतली आहे.
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 16May 2021, 19:33 :00
कोपरगाव : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये कोपरगाव जिल्ह्यात चांगलीच आघाडी घेतली आहे आहे. सध्याच्या घडीला दिवसाला तब्बल ४४४ लोकांना लस (Covid vaccine) दिली जात आहे, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली. लसीकरणाचा हा वेग आणखी वाढू शकतो. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाकडुन कोपरगावला अधिकाअधिक लसींचा पुरवठा होईल यासाठी प्रयत्न करु, असे डॉ.कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले. (Covid 19 vaccination in kopargoan )
कोरोना लसीकरणासंदर्भात माहिती देताना डॉ. कृष्णा फुलसौंदर म्हणाले, नियोजन व समन्वयासाठी शहरातील कोपरगाव ग्रामीण रुग्णालय, आत्मा मलिक हॉस्पिटल, संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल या तीन ठिकाणी तर तालुक्यातील चासनळी, दहेगाव बोलका, पोहेगाव, संवत्सर, टाकळी- ब्राह्मणगाव व वारी या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण ठेवण्यात आले होते.
२८ फेब्रुवारी ते १३ मे २०२१ या ७५ दिवसात कंसात त्या केंद्रात झालेल्या लसीकरणाचे आकडे कोपरगावला आतापर्यंत लसीचे सुमारे ३३ हजार ९३५ डोसेस प्राप्त झाले असून त्यापैकी ३३ हजार २९८ डोसेसचा वापर झाला आहे. ६३७ डोस बाकी आहेत. कोपरगाव ग्रामीण रुग्णालय(८९६५), आत्मा मलिक हॉस्पिटल(२८००), संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल(२६७५) या तीन ठिकाणी तर तालुक्यातील चासनळी(३२०१), दहेगाव बोलका(३४७२), पोहेगाव(३७०२), संवत्सर(२६८९), टाकळी- ब्राह्मणगाव (३६९६)व वारी (२३३९)या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण ठेवण्यात आले होते .