शवविच्छेदन अहवालामुळे खुनाचा उलगडा- डॉ. फुलसौंदर
Autopsy report reveals murder-Dr. Fulsondar
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 17May 2021, 11:33 :00
कोपरगाव : पोलीसांनी सुरुवातीला आत्महत्या केली म्हणून ग्रामीण रुग्णालयात आणले होते. मात्र डॉ. संदीप वैरागर यांनी शवविच्छेदन केल्यामुळे खुनाचा उलगडा झाला. असल्याचा दावा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी केला असून पोलिस त्यांच्या महिती मध्ये याचा साधा उल्लेख करत नाही, याबद्दल मात्र त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
तालुक्यातील मढी खुर्द येथे घरात दोघेच पती व पत्नी राहत असतांना त्यांच्यात झालेल्या भांडणातुन पतीने पत्नीच्या डोक्यावर मागील बाजूस काहीतरी टनक शस्त्राने मारून जिवे ठार मारल्याची घटना गुरूवारी (१३) राेजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आणि १५ मे रोजी उघडकीस आली. सुवर्णा विजय ऊर्फ बंडू गवळी असे मृताचे नाव आहे.त्यानंतर तिचा मृतदेह काहीतरी ज्वालाग्रही पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या अंगावरील जळालेले कपड्यांचे अवशेष लपवून ठेवले व तिच्या मृत शरीरावर नवीन कपडे घातले व मयताने आत्महत्या केल्याची खोटी माहिती नातेवाईकांना देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.दरम्यान आरोपी पती फरार झाला.
मात्र दुसर्या दिवशी मढी खुर्दचे पोलीस पाटील यांनी सदर घटनेची माहिती कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना दिली . सदर घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा वगैरे करून आत्महत्या केली असे समजून अकस्मात मृत्यूची नोंद करून सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय चांगला इथे आणला
ग्रामीण रुग्णालय येथील डॉ. संदीप वैरागर यांनी काळजीपूर्वक शवविच्छेदन केल्यामुळे खुनाचा गुन्हा उघडकीस आला असल्याचा दावा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर फुलसौंदर यांनी केला, तर पोलिसांनी याबाबत साधा उल्लेखही केला नाही याबद्दल मात्र त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव व त्यांच्या कर्मचाऱ्यांना याप्रकरणी संशय येत होता. यामुळे गावात खबऱ्यांना प्रकरणाचा कानोसा घेण्यास लावला. तसेच शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल तत्काळ मिळण्याची व्यवस्था केली. कोपरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन झाल्यानंतर सुवर्णा विजय गवळी हिचा डोक्यावर मागील बाजूस काहीतरी टनक शस्त्राने मारून खून झाल्याचे निष्पन्न झाले. तेव्हा पोनि. जाधव यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून तपासाअंती हा खुन झाल्याची त्यांची खात्री झाली, खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी कोणीच फिर्यादी वाली मिळाला नाही. यामुळे पोलिसांनाच मृत पत्नीला न्याय मिळवून देण्यासाठी फिर्याद दाखल करण्याची जबाबदारी पार पाडावी लागली. पोहेकॉ.१९० अमर वैजिनाथ गवसने यांनी फिर्याद दाखल केली.





