जमिनीच्या वादातून एकाचा खून ; नऊ जणांवर गुन्हा दाखल
Murder of one in a land dispute; Charges filed against nine persons
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 17May 2021, 20:33 :00
कोपरगाव : तुझी जमीन दुसऱ्याला का विकली ती मला का नाही दिली मी घेतली असती असे म्हणून आरोपी मजकूर यांनी गैर कायद्याची मंडळी जमवून हातात लोखंडी रॉड काठ्याने मारहाणीत एकाचा खुन झाला. ही घटना तालुक्यातील धोत्रे गावात (१०मे )ला घडली, परंतु सोमवारी (१७मे) ला दाखल करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
सोमवारी (१० मे) रोजी रात्री ९ वाजेचे सुमारास आप्पासाहेब मारुती चंदने (४०) यांना घरासमोर बाबासाहेब राधाकिसन चंदने, भूषण बाबासाहेब चंदने , सोमनाथ बाबासाहेब चांदणे, विलास कडू चंदने,आकाश विकास चंदने, सुनिता गणपत चंदने, गौरव गणपत चंदने, प्रताप गणेश काटे, भाऊसाहेब निवृत्ती काटे सर्व राहणार धोत्रे यांनी गैर कायद्याची मंडळी जमवून हातात लोखंडी रॉड काठ्या घेऊन यातील फिर्यादीचे घरासमोर येऊन आरोपी नंबर एक हा मयतास म्हणाला की तुझी जमीन दुसऱ्याला का विकली ती मला का नाही दिली मी घेतली असती असे म्हणून आरोपी क्रमांक१,२,३,८ यांनी काठीने महत्त्वाच्या पाठीवर पोटावर हातावर पायावर मानेवर, व आरोपी क्रमांक ५,६,७,९ यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून दमदाटी केली व आरोपी क्रमांक ४ याने मयताच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून गंभीर दुखापत करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करून यातील मयतास जीवे ठार मारले, याप्रकरणी
वनिता अण्णासाहेब चंदने (३५) यांनी कोपरगाव तालुका पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली . सदर तक्रारीवरून पोलिसांनी वरील नऊ आरोपी विरोधात पोलिसांनी गु.र.न.व कलम- फास्ट १६३/२०२१ भा द वी कलम३०२,१४३,१४७,१४८,१४९,३२३,५०४,५०६ प्रमाणे .गुन्हा दाखल केला . पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव हे स्वतः करीत आहेत.