कोपरगाव घारी डाऊच येथे बिबट्याचा खात्रीशीर वावर

कोपरगाव घारी डाऊच येथे बिबट्याचा खात्रीशीर वावर

The leopard is sure to roam at Kopargaon Ghari Douch

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 20May 2021, 14:20 :00

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील
जुन्या मुंबई नागपूर महामार्गावरील घारी  येथील उमरी नदीकाठी  दिवसा बिबट्याचा खात्रीशीर वावर असल्याचे  बुधवारी (१९) रोजी शेतात काम करण्यास गेलेल्या किशोर पवार या शेतकऱ्याने पाहिले व आरडा ओरड करून ही बाब इतर शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.

डाऊच बुद्रुक व घारी गावच्या मधून उमरी नदी वाहते या उमरी नदीच्या काठी दाट झाडी असल्याने बिबट्याला लपायला जागा मिळाली आहे. बिबट्याचा वावर असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपल्या शेतामध्ये जायचे का असा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. वन विभागाने या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी सध्या परिसरातून होत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page