संत ज्ञानेश्वर ज्युनिअर कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेस सुरूवात
Admission process of Sant Dnyaneshwar Junior College begins
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 20May 2021, 14:40 :00
कोपरगाव : कोरोना महामारी मुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या त्यामुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कोणत्या प्रकारे करायचे हे अजून निश्चित झाले नसले तरी अकरावीचे ऑनलाईन वर्ग त्वरित सुरू करून संत ज्ञानेश्वर ज्युनिअर कॉलेज मध्ये सुरुवातीला विद्यार्थ्यांचे बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करून घेण्यात येणार आहेत.
अकरावी सायन्स व कॉमर्सच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी कॉलेजने ऑनलाईन लिंक प्रसिध्द केली आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची गर्दीमुळे गैरसोय होऊ नये यासाठी तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश देण्यात येत आहेत. विज्ञान शाखेसाठी आयटी इलेक्ट्रॉनिक्स हे वैयक्तिक विषय देखील उपलब्ध आहेत. तसेच जेईई, नीट व सीईटी या सारख्या विविध प्रवेश परीक्षांचे मार्गदर्शन देखील अकरावी पासूनच करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या चॅप्टर वाईज टेस्ट घेणे, ग्रुप डिस्कशन करणे, प्रत्येक विषयासाठी तज्ञांकडून मार्गदर्शन देणे व विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी वेळेचे नियोजन कसे करावे याचे योग्य मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता जास्तीत जास्त वाढविण्याचे काम कॉलेजच्या प्राध्यापाकांकडून केले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेर कोचिंग क्लासला जाण्याची गरज भासत नाही अशी माहिती संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी विशाल झावरे यांनी दिली. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप ११ वी च्या वर्गासाठी ऑनलाईन प्रवेश नोंदणी केली नसेल अशा विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या लिंक द्वारे ऑनलाईन फॉर्म भरून आपला प्रवेश निश्चित करावा. https://forms.gle/p3nFT7CoGc5kHntE8





