शिक्षकांची अशैक्षणिक कामे शासकीय सहाय्यक बनवून सुशिक्षित बेरोजगारांना द्या – तुषार पोटे
Make the non-educational work of teachers a government assistant and give it to the educated unemployed- Tushar Pote
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 20May 2021, 17:40 :00
कोपरगाव :शिक्षकांची अशैक्षणिक कामे शासकीय सहाय्यक बनवून सुशिक्षित बेरोजगारांना द्या, अशी नवी संकल्पना नगर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे यांनी मंत्रालयात सादर केली, संकल्पनेला मंत्री महोदयांकडून सकारात्मक प्रतिसाद
जनगणना, सर्व्हे, बीएलओ, आरोग्य तपासणी अश्या प्रकारची तब्बल शंभरहुन अधिक अशैक्षणिक कामे शिक्षकांमार्फत नाईलाजाने व जबरदस्तीने करवून घेण्यापेक्षा ही अशैक्षणिक कामे तात्पुरत्या स्वरूपात अथवा कंत्राटी पद्धतीने रुजू करून शासकीय सहाय्यक बनवून सुशिक्षित बेरोजगारांना द्या, ज्यामुळे शिक्षक संघटनांची नाराजी दूर होऊन सुशिक्षित बेकार युवकांच्या रोजगाराचा प्रश्नही काही प्रमाणात सुटेल अशी संकल्पना तुषार पोटे यांनी बुधवारी (१९मे) रोजी मंत्रालयात राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात, कौशल विकास मंत्री ना.नवाब मलिक यांच्या समोर सादर केली.
आपल्या सादरीकरणात तुषार पोटे यांनी शिक्षकांमार्फत नाईलाजाने व जबरदस्तीने करवून घेतलेली कामे खरोखरच परिपूर्ण होतात काय?असा प्रश्न उपस्थित केला . मात्र ह्याच प्रकारची कामे करण्यासाठी शासनाला सहाय्य म्हणून राज्यातील पात्र व सुशिक्षित बेरोजगारांना तात्पुरत्या स्वरूपात अथवा कंत्राटी पद्धतीने रुजू करून संधी दिल्यास रोजगार देखील मिळेल व शिक्षक संघटनांच्या तक्रारी देखिल कमी होतील. गृहरक्षक दल ज्या पद्धतीने कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलीस दलाची सहाय्यता म्हणून काम करते त्याच अनुषंगाने प्रशासकीय सहाय्यता म्हणून महसूल व कौशल विकास – रोजगार विभागाच्या माध्यमातून अश्या प्रकारे स्वतंत्र दल निर्माण करता येणे शक्य आहे. ज्या मार्फत सुशिक्षित बेरोजगारांची नोंदणी व गुणवत्ता चाचणी करून प्रशासकीय कामात कंत्राटी पध्दतीने बेरोजगार युवकांना सहभागी करून घेता येईल असेही पोटे यांनी सादरीकरणात म्हटले आहे. मंत्रालयात सादर केलेल्या या संकल्पनेला मंत्री महोदयाकडून सकारात्मक मिळाला असल्याचे तुषार पोटे यांनी सांगितले. ह्या कामी आमदार सुनील अण्णा शेळके, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांचे मोलाचे मार्गदर्शन पोटे यांना लाभले आहे.