दिलासादायक : कोरोना रुग्णांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण वाढले
Reassuring: Healing rate increased compared to corona patients
कोपरगावात कोरोना रुग्ण तपासणीचा ५० हजारीचा टप्पा पार ! Corona patient examination in Kopargaon passes 50,000 stage
कोपरगाव कोरोना रुग्णसंख्येतील वाढ घटत असून नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यां रूग्णांची संख्या जास्त असल्याची समाधानकारक बाब समोर आली आहे.
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 21May 2021, 18:00 :00
कोपरगावात आज शुक्रवारी (२१मे) रोजी मागील २४ तासांत कोपरगावात ५१ नवीन रुग्ण सापडले असून रूग्ण वाढ घटत असून नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या १०५ ही जास्त असल्याची समाधानकारक बाब समोर आली आहे. ७७३ कोरोना रुग्णावर ठिकठिकाणी उपचार सुरू आहे तर २ जणांचा मृत्यू (Covid Deaths) झाला आहे. आत्तापर्यंत ५२ हजार ८१२ नागरिकांनी स्वॅब तपासणी केल्याने कोपरगावात कोरोना रुग्ण तपासणीचा ५० हजारीचा टप्पा पार केला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
शुक्रवारी (२१मे) रोजी रॅपिड टेस्ट मध्ये ५५६ जणांपैकी ५१७ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर ३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर खाजगी रुग्णालयातील ११ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून नगर येथे पाठविलेल्या तपासण्यापैकी १ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शुक्रवारी एकूण ५१ रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत. तर आजमितीला कोपरगावात एकून ७७३ कोरोना रुग्णावर ठिकठिकाणी उपचार सुरू असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
मागील आठवड्यात शनिवारपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८. १८ टक्के तर कोरोना ग्रस्तांचे प्रमाण केवळ २३. ८२ टक्के कोरोनामुळे मृत्यू झालेले यांचे प्रमाण १.५२ टक्के इतकी होती हे. शनिवारी कोपरगाव येथील कोविड सेंटरमध्ये ८१ रुग्णावर उपचार सुरु होते . तर गेल्या सहा दिवसांपासून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून शुक्रवारी (२१मे) रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१. ७१ टक्के तर कोरोना ग्रस्तांचे प्रमाण केवळ २१. ७७ टक्केवर घसरले तर गेल्या सहा दिवसात १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने यांचे प्रमाण १.५७ टक्के इतके आहे. शुक्रवारी १०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले होते .
शुक्रवारी (२१ मे) पर्यंतचे कोपरगाव कोरोना अपडेट : ५२८१२ स्वॅब तपासणी यात २०४५० नगर, रॅपिड टेस्ट ३२३६२, यात ४१३१६ निगेटिव्ह तर ११४९६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते ,पैकी १०५४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दुर्दैवाने १८० जणांचा मृत्यू, आजमितिला कोपरगाव शहर व तालुक्यात सद्यस्थितीत ७७३ कोरोना बाधित रुग्ण असून ते एस. एस. जी. एम. कॉलेज, संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल आत्मा मालिक हॉस्पिटल, कर्मवीर शंकरराव काळे कोविड सेंटर, संजीवनी कोविड सेंटर, गौतम पब्लिक स्कूल कोविड सेंटर, डॉ. मुळे हॉस्पिटल, डॉ. कोठारी हॉस्पिटल, डॉ. अमोल अजमेरे हॉस्पिटल आदी ठिकाणी उपचार घेत आहेत.तर ४७४ जणांचे स्वॅब तपासणीसाठी नगरला पाठवले आहेत, अशी माहिती डॉ. फुलसौंदर यांनी दिली.