रिक्षा व टॅंक्सीचालकांना शासनाने अनुदान दयावे – सौ स्नेहलता कोल्हे

रिक्षा व टॅंक्सीचालकांना शासनाने अनुदान दयावे – सौ स्नेहलता कोल्हे

Government should give subsidy to rickshaw and taxi drivers – Mrs. Snehalat Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 21May 2021, 19:40 :00

कोपरगाव : देशासह राज्यात कोरोनाची लाट व लाॅकडाउनमुळे  वाहनचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याकरीता शासनाने  रिक्षाचालकांसह विविध वाहनचालकांना पाच हजार रूपयाचे अनुदान दयावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांचेकडे केली आहे.

राज्यामध्ये सुरू असलेल्या लाॅकडाउनमुळे बाजारपेठा बंद असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे दळणवळण बंद असल्याने खाजगी वहानेही बंद आहे. त्यामध्ये कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करणा-या अनेक वाहन चालकांचे कामही बंद आहे. यामुळे अनेक कुटूंबांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. रिक्षाचालक, भाडोत्री वाहने,टॅक्सीचालक अशा विविध प्रकारचे वाहनधारक यांचा समावेश आहे. वाहने खरेदी करण्यासाठी अनेकांनी बॅंकेकडून कर्ज घेतलेली आहे. कर्जापोटीचे हप्ते तर भरणे मुश्किल झालेले आहे. परंतु यासाठी आकारण्यात येणारे व्याजही भरणे शक्य नाही. या शिवाय कुटूंब कसे चालवायचे, असा प्रश्न त्यांचे पुढे उभा राहीलेला आहे. त्यामुळे शासनाने राज्यभरातील रिक्षाचालक, टॅक्सीचालक इतर तत्सम वाहनचालकांना किमान पाच हजाराचे अनुदान तातडीने देण्यात यावे, अशी मागणी सौ कोल्हे यांनी केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page