आज कोपरगावात ५३ नवे रुग्ण, ८० कोरोनामुक्त तर एका तरुणाचा मृत्यू
Today, 53 new patients, 80 corona-free and one young man died in Kopargaon
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 22May 2021, 17:00 :00
कोपरगावात आज शनिवारी (२२मे) रोजी मागील २४ तासांत कोपरगावात ५३ नवीन रुग्ण सापडले असून रूग्ण वाढ घटत असून नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या ८० ही जास्त असल्याची समाधानकारक बाब समोर आली आहे. ७४६ कोरोना रुग्णावर ठिकठिकाणी उपचार सुरू आहे तर एका २६ वर्षीय तरूणाचा मृत्यू (Covid Deaths) झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
शनिवारी (२२मे) रोजी रॅपिड टेस्ट मध्ये ६३० जणांपैकी ५९७ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर ३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर खाजगी रुग्णालयातील ०४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून नगर येथे पाठविलेल्या तपासण्यापैकी १६ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शनिवारी एकूण ५३ रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत. तर आजमितीला कोपरगावात एकून ७४६ कोरोना रुग्णावर ठिकठिकाणी उपचार सुरू असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
मागील आठवड्यात शनिवारपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८. १८ टक्के तर कोरोना ग्रस्तांचे प्रमाण केवळ २३. ८२ टक्के कोरोनामुळे मृत्यू झालेले यांचे प्रमाण १.५२ टक्के इतकी होती हे. शनिवारी कोपरगाव येथील कोविड सेंटरमध्ये ८१ रुग्णावर उपचार सुरु होते . तर गेल्या सात दिवसांपासून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून शनिवारी (२२मे) रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१. ९७ टक्के तर कोरोना ग्रस्तांचे प्रमाण केवळ २१. ४६ टक्केवर घसरले तर गेल्या सात दिवसात १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने यांचे प्रमाण १.५७ टक्के इतके आहे. शनिवारी ८० रुग्ण बरे होऊन घरी गेले होते .
शनिवारी (२२ मे) पर्यंतचे कोपरगाव कोरोना अपडेट : ५३८१५ स्वॅब तपासणी यात २०८२३ नगर, रॅपिड टेस्ट ३२९९२, यात ४२२६५ निगेटिव्ह तर ११५५० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते ,पैकी १०६२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दुर्दैवाने १८१ जणांचा मृत्यू, , तर ३७३ जणांचे स्वॅब तपासणीसाठी नगरला पाठवले आहेत, अशी माहिती डॉ. फुलसौंदर यांनी दिली.





