तूर्तास बँक हप्ते वसुली थांबवून, लॉकडाऊन काळातील व्याज माफ करावे- भरत मोरे
Bank installment recovery should be stopped immediately, interest during lockdown period should be waived- Bharat More
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 22May 2021, 18:40 :00
कोपरगाव : लॉकडाऊन वाढतच आहे. यावेळी सरकारकडून दिलासा देण्यासाठी बँक हप्ते वसुली थांबवून, लॉकडाऊन काळातील व्याज माफ करावे अशी मागणी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख तथा कोपरगाव आगार एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष भरत मोरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती, या मागणीसंदर्भात पुढील कारवाई करण्यासाठी तहसीलदार कोपरगाव यांना पत्र प्राप्त झाले आहे. अशी माहिती भरत मोरे यांनी दिली आहे.
संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे अत्यावश्यक सेवा वगळता मागील महिनाभरापासून इतर सर्व व्यवसायांना टाळे लागले आहे. लहान मोठे सर्वच व्यवसाय बंद असल्यामुळे आर्थिक उलाढाल बंद झाली आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद आहे. तर अनेकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना कर्जाचे हप्ते कसे भरायचे, असा प्रश्न पडला असल्याचे मोरे यांनी निवेदनात म्हटले आहे . भरत मोरे पुढे म्हणाले,अशा विविध व्यवसायामध्ये काम करणारा कामगार व तेथील मालक,खाजगी विनाअनुदानित शाळा, संस्थापक,शिक्षक, शिकवणी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. असे असले तरी बँकांच्या मासिक हप्ते वसुलीवर कोणतेही निर्बंध लावले नसल्यामुळे महिला बचत गट, व्यावसायासाठी घेण्यात आलेले कर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज आदींची मासिक हप्ता वसुली जोरात सुरू आहे. हाताला कामच नसल्यामुळे बँकांचे हप्ते कसे भरावे. असा प्रश्न सर्वसामान्य ते बडे व्यापारी यांच्या समोर उभा आहे. १५ मे पर्यत असणारा लॉकडाऊन हा १ जूनपर्यत वाढण्याची शक्यता आहे. नियमित सुरू असलेला बँक हफ्ता वसुलीचे काय? यावर सरकार बोलायला तयार नाही. सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षिततेचा विचार करून लॉकडाऊन वाढवले म्हणून जनता सुरक्षित होऊ शकत नाही. तर त्यासोबत असणार्या इतर आर्थिक बाबींचा विचार शासनाने करणे आवश्यक असल्याचे मोरे यांनी शेवटी निवेदनात म्हटले आहे .





