नरेंद्र मोदीचा दिलासा रासायनिक खतांच्या किंमतीवरील अनुदानात ऐतिहासिक वाढ -विवेक कोल्हे

नरेंद्र मोदीचा दिलासा रासायनिक खतांच्या किंमतीवरील अनुदानात ऐतिहासिक वाढ -विवेक कोल्हे

Narendra Modi’s consolation Historical increase in subsidy on chemical fertilizer prices – Vivek Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 23May 2021, 19:40 :00

कोपरगांव : रासायनिक खतांच्या कंपन्यांनी खतांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ केल्यामुळे शेतक-यात नैराश्येचे वातावरण होते शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रासायनिक खतांच्या किंमतीवरील अनुदानात ऐतिहासिक वाढ करून खताच्या किमती कमी केल्याची माहीती इफकोचे जनरल बॉडी प्रतिनिधी विवेक कोल्हे यांनी दिली आहे.

विवेक कोल्हे म्हणाले, लॉकडाऊनमुळे पिकविलेल्या मालाची विक्री कशी करावी या विवंचनेत असतांना वारंवार बंद होत असलेल्या बाजार समित्यांमुळे शेतकरी बांधवांचे आर्थिक गणित पुर्णत: कोलमडले  असून उत्पादन खर्चही कसा निघेल यामुळे शेतकरी चिंतातूर झालेले होते.
 त्यातच रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने  भर पडली होती .नरेंद्र मोदी यांनी रासायनिक खतांच्या अनुदानात १४० टक्के वाढ करुन ऐतिहासिक निर्णय घेऊन मोठा दिलासा दिलेला आहे. डि.ए.पी मध्ये वापरल्या जाणा-या फॉस्फोरिक ऍसिड व अमोनिया यांच्या किंमती आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे खतांचे दर वाढले मात्र दरवाढीचा संपूर्ण भार केंद्र सरकार उचलणार असल्यामुळे शेतकरी बांधवांना याचा निश्चितच लाभ होणार आहे.

केंद्र सरकाने डी.ए.पी खतांच्या अनुदानात प्रती बॅग रुपये ७००/-ने वाढ करण्याचा निर्णय घेतला.इंडीयन फार्मर्स फर्टीलायझर्स को-ऑपरेटीव्ह नवी दिल्ली या प्रमुख खत निर्मिती करणा-या कपंनीने रासायिक खतांच्या विविध ग्रेडच्या खतांच्या किंमतीमध्ये रुपये १००/- ते ७००/- प्रती बॅग कपात करुन किंमती कमी केल्या असून आता एन.पी.के १०:२६:२६ (५०किलो) रुपये-११७५/-, एन.पी.के.१२:३२:१६ (५०किलो)-रुपये-११८५/-  एन.पी.के. २०:२०:0:१३ (५० किलो) रुपये-९७५/, डी.ए.पी.१८:४६:०  (५० किलो) रुपये-१२००/- अशा प्रकारचे दर दिनांक २० मे २०२१  पासून लागू केलेले आहेत तसेच युरीयाची कमतरता दूर व्हावी यासाठी इफकोने नॅनो युरिया (लिक्विड युरिया) ५०० मि.ली.बॉटलमध्ये निर्मिती सुरु केलेली असून लवकरच शेतकरी बांधवांना उपलब्ध होणार असल्याची माहीती श्री कोल्हे यांनी दिली.

Leave a Reply

You cannot copy content of this page