कोपरगावात स्टील चोरणारी सात जणांची टोळी पकडली,
In Kopargaon, a gang of seven steel thieves was caught,
तब्बल १३०० किलो स्टीलसह साडेतीन लाखांचा ऐवज जप्त Seizure of Rs 3.5 lakh along with 1300 kg steel
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 23May 2021, 20:20 :00
कोपरगाव : कोपरगाव शहर परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या स्टील चोरणाऱ्या टोळीच्या कोपरगाव शहर पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या. या टोळीतील आरोपी हे खडकी तालुका कोपरगाव येथील असून १८ ते २४ वयोगटातील तरुण आहेत टोळीतील सात जणांकडून तब्बल १३०० किलो स्टील, एक दुचाकी एक अपे रिक्षा असा साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
हे आहेत आरोपी गटया उर्फ विशाल राजेंद्र शिंदे (१८), दीपक अर्जुन दवंगे (१९), मुकेश मुनीर शेख (२१), सोमनाथ भाऊलाल सुरासे (१९), मुकुंदा ज्ञानेश्वर पवार २४, पवन रमेश भालेराव (१८), आकाश अंकुश खरात (२१) सर्व राहणार खडकी तालुका कोपरगाव अशी अटकेतील सात स्टील चोरांची नावे आहेत. कोपरगाव शहर पोलिसांमध्ये(१९मे) रोजी राजेश शांतीलाल कोकणी यांनी साई सिटी येथील बांधकामावरून पंधराशे किलो स्टील चोरी, कचरू भास्कर निकम यांनी गवारे नगर येथील बांधकामावरून १७० किलो स्टील तर नीरज मदनलाल कासलीवाल जोशीनगर येथून ३५० किलो स्टील चोरीला गेल्याच्या तीन फिर्यादी वेगवेगळ्या तारखेला शहर पोलीस स्टेशनला दाखल झाल्या होत्या या कामी या प्रकरणाचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू पुंड व पोलीस कॉन्स्टेबल सुरज कुमार अग्रवाल यांच्याकडे होता.
असा लागला छडा
कोपरगाव शहर पोलिसांना गुप्त खब-याद्वारे पथकाला माहिती मिळाली की, गटया उर्फ विशाल राजेंद्र शिंदे कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या खडकी येथे आहे. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांने वरील आपल्या सहा साथीदारांची नावे सांगितली व साईसिटी येथील काटवनात लपविलेले स्टील पोलिसांना दाखविले पोलिसांनी या सात जणांच्या ताब्यातून तेराशे किलो स्टील एक दुचाकी, एक ॲपे रिक्षा असा साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील अपर पोलीस अधीक्षक सौ. दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले , पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू पुंड व पोलीस कॉन्स्टेबल सुरज कुमार अग्रवाल यांनी केली.
Post Views:
377