कोपरगावात  सोमवारी पूर्वमोसमी पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या.

कोपरगावात  सोमवारी पूर्वमोसमी पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या.

Heavy showers of pre-monsoon rains lashed Kopargaon on Monday.

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 24May 2021, 18:00 :00

कोपरगाव : कोपरगाव शहर आणि तालुक्यातील काही भागांत सोमवारी दुपारी पूर्वमोसमी पावसाच्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह मुसळधार सरी कोसळल्या. अवघ्या वीस एक मिनिटात काही मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

कमी दाबाच्या पट्टय़ांमुळे सध्या राज्याच्या

विविध भागांत पावसाळी वातावरण असून काही ठिकाणी मुसळधार कोसळणारा असल्याचा अंदाज वेधशाळेने दिला  आहे. गेल्या आठवडय़ातही तौत्के चक्रीवादळामुळे दोन तीन दिवस ढगाळ वातावरण होते व पावसाच्या सरी कोसळल्या. सोमवारी (२४मे) रोजी कोपरगाव शहर आणि परिसरात सकाळपासून दुपारपर्यंत ढगाळ वातावरण व उन्हाचा लपंडाव सुरू होता. मात्र, दुपारी साडेचारनंतर आकाश ढगाळ झाले. साडेचारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वादळ वारा व मुसळधार पावसाला सुरुवात होऊन नंतर पावसाचा जोर वाढला. सुमारे वीस  पंचवीस मिनिटे झालेल्या या पावसाने घराबाहेर आवश्यक कामांसाठी असलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. त्याचप्रमाणे काही वेळांतच रस्त्यांवर पाणी जमा झाले.

Leave a Reply

You cannot copy content of this page