संजीवनीच्या २९ विद्यार्थ्यांची कमिन्स मध्ये निवड – श्री अमित कोल्हे
Selection of 29 students of Sanjeevani in Cummins – Mr. Amit Kolhe
कोविड-१९ च्या काळातही संजीवनीची यशस्वी वाटचाल
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated:Tue25 May, 2021, 16:00 :00
कोपरगांवः संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने कोविड-१९ च्या काळात ऑनलाईन पध्दतीने आयोजीत करण्यात आलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत कमिन्स इंडिया लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीने संजीवनीच्या २९ विद्यार्थ्यांची ट्रेनी इंजिनिअर पदावर निवड केली असुन संजीवनीने ग्रामिण भागातील विध्यार्थ्यांना नोकऱ्या देवुन मोठी उपलब्धी साधली आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
श्री कोल्हे यांनी पत्रकात म्हटले आहे की मागील अनेक वर्षांपासून कमिन्स मार्फत संजीवनीच्या विद्यार्थ्यांची पहिल्या पसंतीने निवड केली जाते. अगोदर निवड झालेले व कंपनीत कार्यरत असलेले संजीवनीचे माजी विध्यार्थी तेथे आस्थेने, जबाबदारीने कर्तव्य निभावतात. त्यांचे उत्तम करीअर घडविणसाठी ते नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून कंपनीच्या वृध्दीसाठी प्रयत्न करतात. या सर्व बाबींचे धडे त्यांना संजीवनीमधुनच मिळाल्याने कंपनी सुध्दा नव्याने इंलिनिअर्सची भरती करताना संजीवनीला प्रथम प्राधान्य देते. या कपंनीत कार्यरत असलेल्या अनेक माजी विद्यार्थ्यांना कमिन्सच्या जगभर पसरलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांमध्येही काम करण्याची संधी मिळत आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये किशोर साहेबराव गोर्डे, रामकिसन प्रविण पेहरकर, ओंकार राजेंद्र बोरावके, रूपेश बाळासाहेब शेरकर, संदेश संजय आगळे, आदित्य नानासाहेब नवगिरे, सचिन राजेंद्र खरात, अभिशेक सुनिल डोखे, अक्षय सुनिल डुचे, अक्षय रमेश केाते, शुभम दत्तु गुंजाळ, सिध्देश अशोक शिंदे , देवांशु विजय पाटील, कोमल लहु वाघमारे, प्रशांत शंकपाळ शेलार, श्रेयश अविनाश पाटील, संचिन संजय पवार, यश शंकरलाल परदेशी , ऋषभ राजेंद्र जगताप, साईनाथ भास्कर इजगे, अभिषेक प्रल्ळाद लांडगे, शुभम संजय आभाळे, अक्षदा बाळासाहेब पांगारकर, तोहिद अमिर शेख , घनशाम शिवाजी नजन, शुभम राजेंद्र वाघ, अरूणा भास्कर कोळसे, सिध्दार्थ कैलास सांगळे व वैभव विलास त्रिभुवन यांचा समावेश आहे. वरील सर्व हे विद्यार्थी ग्रामीण भागातील असुन कोविड १९ च्या महामारीत आपल्या पाल्यांना नोकरी मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांनी संजीवनीच्या व्यवस्थानाप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व यशस्वी विध्यार्थी व त्यांच्या भाग्यवान पालकांचे, प्राचार्य ए. आर. मिरीकर आणि संस्थचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आय. के. सय्यद यांचे अभिनंदन केले आहे.