आधी मतदार संघातून कोरोनाची हद्दपारी करू, मगच सत्काराचे काय ते बघू ! -विवेक कोल्हे

आधी मतदार संघातून कोरोनाची हद्दपारी करू, मगच सत्काराचे काय ते बघू ! -विवेक कोल्हे

Let’s expel Corona from the constituency first and then let’s see what the reception is! -Vivek Kolhe

 कोपरगांव : आज कोरोनाची दुसरी लाट मोठी जीवघेणी ठरली असतांना कोरोना रूग्णांसाठी सर्वांचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत, खरा सत्कार कोरोनात अहोरात्र लढणारे प्रशासकीय व पोलीस अधिकारी, डॉक्टर्स, वैद्यकीय व स्वच्छता कर्मचारी, यांचा करायला हवा,आधी मतदार संघातून कोरोनाची हद्दपारी करू तेंव्हाच खरी लढाई जिंकल्याचे आपणा सर्वांना समाधान होईल. मगच सत्काराचे काय ते बघू अशा गोड शब्दात विवेक कोल्हे यांनी त्यांचा सत्काराला फाटा देऊन सत्कार करू इच्छिणाऱ्या युवकांचे समाधान केले.

कोपरगांव तालुक्यातील युवानेते विवेक कोल्हे यांनी आत्मा मालिक संकुल कोकमठाण येथे संजीवनी कोविड सेंटर उभारुन सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देण्याचे काम केलेले आहे. संजीवनी कोविड सेंटरच्या माध्यमातून कोरोनाबाधीत रुग्णांना मोफत उपचार मिळावे यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठाणच्या वतीने सर्व यंत्रणा उभी करुन रुग्णांची काळजी घेत आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन कोपरगांव तालुक्यातील युवकांनी विवेक  कोल्हे यांचा सत्कार करण्याचे ठरविले होते. असे अनुराग येवले यांनी म्हटले आहे.

यावेळी विवेक कोल्हे म्हणाले, आज दुर्देवाने कोरोना संक्रमण झालेल्या रुग्णांना उपचारासोबत मानसिक आधाराचीही खरी गरज आहे. आपण प्रत्येकजण समाजासाठी काहीतरी देणे लागतो या भावनेने कार्य केल्यास कोरोना नक्कीच हद्दपार होईल असा विश्वास व्यक्त केला. सध्याची वेळ ही सत्काराची नसून सत्कार्याची आहे असे ते शेवटी म्हणाले,

Leave a Reply

You cannot copy content of this page