तिस-या लाटेपुर्वी कोपरगावकरांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा मिळण्याची शक्यता,

तिस-या लाटेपुर्वी कोपरगावकरांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा मिळण्याची शक्यता,

स्थायी समितीकडून कोटींवधीचे प्रस्ताव मंजूर

Kopargaon residents likely to get high quality health care before the third wave,

Standing Committee approves crores of proposals

आता निर्णय मुख्याधिकारी व नगराध्यक्षांचाNow it is up to the chief Officer  and the mayor to decide

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated:Fri28 May, 2021, 19:00 :00

कोपरगाव : उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी स्थायी समितीकडून (Standing Committee). कोट्यवधींच्या मशिनरींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना तिस-या लाटेपर्यंत कोपरकरांना पालिकेकडून स्वस्तात उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा मिळण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. मात्र आता यासाठी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांचा निर्णय महत्वाचा आहे.

कोरोना काळात कोपरगांव नगरपरिषदेच्या कर्मचा-यांनी कोरोना योद्धे म्हणून काम करणा-या कर्मचा-यांचा ५ लाखाचा विमा,नगरपरिषदेमार्फत एच.आर.सी.टी स्कॅनींग मशीन, ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर, अद्यावत कार्डीयाक अँम्बुलन्स तसेच नगरपरिषदेच्या विविध विभागांतर्गत येणा-या विकास कामांना (२७मे ) रोजी झालेल्या स्थायी समितीच्या ऑनलाईन सभेमध्ये मंजुरी दिली असून यासंदर्भात लवकरच मा.जिल्हाधिकारी यांचेकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, भाजपा गटनेते रविंद्र पाठक व शिवसेना गटनेते योगेश बागुल यांनी दिली आहे.

कोपरगांव शहरवासियांसाठी सुसज्ज कोविड सेंटर सह आरोग्य विषयक अद्यावत यंत्रणा नगरपरिषदेने उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे व युवानेते विवेक कोल्हे यांनी सातत्याने नगरपरिषद प्रशासनाकडे केली होती. या मागणीस भाजपा व शिवसेना युतीच्या सर्व नगरसेवकांनी एकमताने मंजुरी दिल्याने कोपरगांवकरांना निश्चितच दिलासा मिळणार आहे.

कोरोनाच्या तिस-या लाटेचा परिणाम हा विशेषत: लहान बालकांवर होणार असल्यांची चिंता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी वर्तविली असल्यामुळे औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमध्ये पेडीयाट्रीक रुग्णालयाची उभारणी करण्याची मागणी नुकतीच विवेक कोल्हे यांनी केली होती त्यांच्या या मागणीचा सर्व नगरसेवकांनी सभेमध्ये सकारात्मक विचार व्हावा अशी मागणी केली त्यामुळे लवकरच नगरपरिषद प्रशासन या इमारतीची पाहणी करुन या ठिकाणी पेडीयाट्रीक रुग्णालय उभारण्यासाठी आवश्यक प्रस्ताव मा.जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे दाखल करणार आहे. या सर्व विषयांना भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीच्या नगरसेवकांनी सभेमध्ये मंजूरी दिलेली असून याबाबत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष निर्णय घेतात की नाही याकडे आता सर्व कोपरगांवकरांचे लक्ष लागलेले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page