परवानाधारक रिक्षा चालकांना प्रत्येकी १ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर-कैलास जाधव

परवानाधारक रिक्षा चालकांना प्रत्येकी १ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर-कैलास जाधव

Sanugrah grant of Rs 1,500 each to licensed auto rickshaw drivers – Kailas Jadhav

कोपरगाव : राज्यातील सात लाख पंधरा हजार रिक्षा परवाना धारकांना प्रत्येकी १ हजार ५०० रुपये प्रमाणे एकूण १०७ कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. ही राज्य सरकारने जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानाची रक्कम वेळेवर लाभधारकांच्या खात्यावर जमा व्हावी यासाठी सर्व रिक्षा परवाना धारकांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी तात्काळ जोडणी करुन घ्यावे, असे आवाहन कोपरगाव तालुका रिक्षा संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव यांनी केले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र सालकर म्हणाले, रिक्षा परवाना धारकांच्या खात्यावर ही रक्कम थेट जमा करता यावी यासाठी परिवहन विभागामार्फत
विकसित केलेल्या या प्रणालीची माहिती विभागाच्या www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यामध्ये परवानाधारक रिक्षा चालकांना आपला आधार क्रमांक, वाहन क्रमांक व अनुज्ञप्ती क्रमांक याची माहिती ऑनलाइन पद्धतीने भरावी लागणार आहे. त्यानंतर रिक्षा चालकांच्या कागदपत्रांची खातरजमा करण्यात येईल. ती झाल्यानंतर आधार क्रमांकाशी जोडणी असलेल्या बँक खात्यामध्ये ठरवण्यात आलेली रक्कम ऑनलाईन पध्दतीने जमा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी जाहीर केल्यानंतर राज्यातील विविध घटकांसाठी मोठे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. मात्र रिक्षा चालकांना यातून वगळण्यात आले होते, त्यामुळे कोपरगाव तालुका ऑटोरिक्षा संघटनेने संस्थापक, शिवसेना नगर उत्तर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, रिक्षा संघटना अध्यक्ष कैलास जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र सालकर,यांच्या मार्गदर्शनाखाली टॅक्सी सेना अध्यक्ष अस्लम शेख, रिक्षा सेना अध्यक्ष पोपट झुरळे , ज्येष्ठ संचालक गोकुळ हंडोरे, मधुकर जाधव,सुनिल तांबट,पापा तांबोळी,अनिल वाघ आदीनी संघटनेच्या मार्फत रिक्षाचालकांना प्रत्येकी किमान दहा हजार रुपयांचे पॅकेज मिळावे यासाठी वारंवार मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती .अशी माहिती सालकर यांनी दिली.

Leave a Reply

You cannot copy content of this page