शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न -आ. आशुतोष काळे

शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न -आ. आशुतोष काळे

मढी खुर्द येथे कृषी संजीवनी सप्ताह सांगता

कोपरगाव :

शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न सुरु असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी मढी खुर्द येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै ते ७ जुलै, कृषी दिनी जनजागृती  मोहिमेअंतर्गत कृषी संजीवनी सप्ताह सांगता प्रसंगी केले .

आ. काळे पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तम जान असणारे महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे. मागील वर्षी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने सरकारकडून १९.६७ कोटी रुपयांची मदत मिळवून दिली.

चालू हंगामात शेतकऱ्यांनी खरेदी केलेले सोयाबीन बियाणे निकृष्ट दर्जाची निघाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्याची दखल घेवून बियाणे उत्पादक कंपन्यांना शेतकऱ्यांना निवीन बियाणे देण्यास भाग पाडले. काही बियाणे उत्पादक कंपन्यांवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबद्दल कायदेशीर कारवाई देखील केली.

कृषी विभागाने शेतीशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर घेवून गेले, तरच शेतकऱ्यांची प्रगती होणार आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने प्रयत्न करावे असे आवाहन आमदार काळे यांनी केले. यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.

तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव म्हणाले की, मागील वर्षी कोपरगाव तालुक्यात मका पिकाचे लष्करी अळीमुळे मोठे नुकसान झाले होते.मका पिकाला विमा कवच नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. मात्र यावर्षी आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांमुळे मका पिकाला विमा संरक्षण देण्यात आले आहे. तसेच आ. आशुतोष काळे यांनी केलेल्या प्रयत्नातून शेततळे अस्तरीकरनाचे ६६ लाभार्थ्यांचे ४४ लाख ९८ हजार रुपयांचे अनुदान, कांदा चाळीचे ६६ लाभार्थ्यांचे ५७ लाख ५७ हजार रुपयांचे अनुदान व ३७४ शेतकऱ्यांना ४३ लाख ९० हजार रुपये ठिबक सिंचनाचे अनुदान शेतकऱ्यांना मिळवून दिले असल्याचे यावेळी सांगितले.

याप्रसंगी कृषी शास्त्रज्ञ भरत दवंगे यांनी यावेळी पीक व्यवस्थापन व कीड नियंत्रणसंदर्भात सखोल मार्गदर्शन केले.

याप्रसंगी कृषी शास्त्रज्ञ भरत दवंगे, उपविभागीय कृषी अधिकारी बोराडे, पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, सुनील शिंदे, सरपंच वैशाली आभाळे, मोहनराव आभाळे, उत्तम कुऱ्हाडे, श्रीधर आभाळे, सोपान आभाळे, रोहिदास होन, राहुल रोहमारे, सुभाष आभाळे, राहुल जगधने, भाऊसाहेब कुऱ्हाडे, माधव आभाळे, हरिभाऊ जावळे, विठ्ठल जावळे, रंभाजी आभाळे, प्रमोद आभाळे, नामदेव गवळी आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page