आमदार काळेंकडून कोरोना योद्ध्यांचा सत्कार व आपत्कालीन कक्षाचे उद्घाटन
MLA Kalen felicitates Corona Warriors and inaugurates emergency room
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated:Wed9June :18.30
कोपरगाव : तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे यामध्ये कोरोना योद्ध्यांचे अजोड योगदान असून जीवघेण्या संकटात आपल्या जीवावर उदार होवून त्यांनी केलेल्या कामाची दखल घेवून आमदार आशुतोष काळे सोमवारी (दि.१४) रोजी कोरोना योद्ध्यांचा सत्कार करणार आहेत तर याचवेळी ते आपत्कालीन कक्षाचे उद्घाटन देखील करणार आहेत.
मार्च-एप्रिल महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रकोपात आ. आशुतोष काळे यांनी प्रशासनाला सर्वोतोपरी मदत व उपाय योजनांमुळे हजारो रुग्ण बरे होवून सुखरूपपणे आपल्या घरी गेले आहे. यात कोरोना योद्ध्यांनी दिलेले योगदान व केलेला त्यागाची आठवण ठेवून कोपरगाव तालुक्याच्या जनतेच्या वतीने आमदार आशुतोष काळे सोमवारी पहिल्या फळीतील तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, डॉ. कृष्णा फुलसौंदर, डॉ. संतोष विधाते, डॉ. भाग्यश्री बडदे, तसेच पत्रकार, डॉक्टर अशा अनेक कोरोना योद्ध्यांचा सत्कार करणार आहेत.
तसेच पावसाळा सुरु झाला असून यावर्षी देखील हवामान विभागाकडून मोठ्या प्रमाणात पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मागील काही वर्षांचा अनुभव लक्षात घेता अतिवृष्टीमुळे सर्वसामान्य नागरिकांपुढे अडचणी निर्माण होवू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्व प्रकारच्या उपाय योजना करण्यात आल्या आहेत. तरीदेखील आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना आपत्कालीन कक्षाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार काळे यांच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे.