संजीवनी पाॅलीटेक्निक: २८ विद्यार्थ्यांची मदरसन कंपनीत निवड – अमित कोल्हे

संजीवनी पाॅलीटेक्निक: २८ विद्यार्थ्यांची मदरसन कंपनीत निवड – अमित कोल्हे

Sanjeevani Polytechnic: 28 students selected in Motherson Company – Amit Kolhe

संजीवनीच्या प्रयत्नाने विद्यार्थी व पालकांची स्वप्नपुर्ती Fulfill the dreams of students and parents through the efforts of Sanjeevani

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated:Thu10June :10.30

कोपरगांव: संजीवनी के.बी.पी.पाॅलीटेक्निकच्या मदरसन ऑटोमोटिव्ह टेक्नाॅलाॅजीज अँड इंजिनिअरींग या बहुराष्ट्रीय कंपनीत २८ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी आकर्षक पगारावर निवड केल्याने विद्यार्थी व पालकांची स्वप्ने, विद्यार्थ्यांच्या अंतिम निकालाच्या अगोदरच संजीवनी पुर्ण करीत आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

अमित कोल्हे म्हणाले की, संजीवनी पाॅलीटेक्निकमध्ये बहुतांशी विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहे. कोरोनामुळे ग्रामीण अर्थकारणाचा कणा मोडकळीस आला असता संजीवनी पाॅलीटेक्निकने आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाव्यात यावर लक्ष केंद्रीत केल्याचे विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या नोकऱ्यांमधून अधोरेखित होत आहे.

मदरसन ऑटोमोटिव्ह टेक्नाॅलाॅजीज अँड इंजिनिअरींग या कंपनीने निवड केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये गौरव शेलार , राहुल अव्हाड, विवेक गीते, वेदांत क्षिरसागर, आदित्य माळवे, सुरज शिंदे , देवेन चोप्रा, यश परदेशी , रवी पगार, विकास ढाकणे, सचिन केकाण, अवधुत कापडी, अभिषेक लांडगे, संकेत पोळ, हितेश थोरात, प्रथमेश वाघ, गौतम जावळे, अमित गायकवाड, संदेश आगळे, सुमित पटाईत, विशाल बेलदार, सचिन पवार, किशोर गोरडे, शुभम बाचकर, प्रशांत शेलार, सत्यम बोरावके, अनिरूध्द चव्हाण, अक्षदा वानखेडकर यांचा समावेश आहे.
माजी मंत्री व संजीवनी ग्रुप इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी निवड झालेले सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच प्राचार्य ए. आर. मिरीकर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट आफिसर प्रा. आय. के. सय्यद यांचेही अभिनंदन केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page