आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचा २२ वा वर्धापन दिन साजरा

आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचा २२ वा वर्धापन दिन साजरा

Come on. Celebration of 22nd Anniversary of NCP under the guidance of Ashutosh Kale

  कोपरगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापन दिन कोपरगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी  संदीप वर्पे म्हणाले की, आ. आशुतोष काळे यांनी कोविड संकटात केलेल्या उपाय योजनांमुळे बाधित रुग्णांची अतिशय चांगल्या प्रकारची सोय झाली. त्यामुळे अनेक नागरिकांचे प्राण वाचले. त्यांच्या कार्याची दखल पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व पक्षाने देखील घेतली आहे. जीवघेण्या कोरोनाच्या संकटात उपाय योजना करत असतांना मतदार संघाच्या विकासाकडे देखील त्यांनी दुर्लक्ष होवू दिले नाही व मतदार संघाचा विकास देखील थांबू दिला नाही. कोपरगावचा विकास करायचा एवढा एकच ध्यास त्यांनी घेतला असून त्यामुळे कोपरगावचे विकासाचे भविष्य उज्वल आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार घराघरात पोहोचवून आ. आशुतोष काळे यांच्यामागे मोठी ताकद उभी करून असा संकल्प यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी केला.                        

यावेळी सौ. पौर्णिमा जगधने,  अर्जुनराव काळे,  सुधाकरराव रोहोम, पद्माकांत कुदळे, कारभारी  आगवन,  गोरक्षनाथ जामदार,  श्रावण आसने, मधुकर टेके,  धरमशेठ बागरेचा, ,  माधवराव खिलारी,  सुनील गंगूले,  सचिन मुजगुले,  सौ. प्रतिभा शिलेदार, चारुदत्त सिनगर,  नवाज कुरेशी,  वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, दिलीपराव शिंदे, दिनकर खरे, सांडूभाई पठाण, दिलीपराव बोरणारे, सौ. मायादेवी खरे, शीतल लोंढे, भाग्यश्री बोराडे, राहुल देवळालीकर, राजेंद्र जोशी, रावसाहेब साठे, सुनील मोकळ, संदीप देवळालीकर, अँड. विद्यासागर शिंदे, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, डॉ. तुषार गलांडे, डॉ. आतिष काळे, अशोक आव्हाटे, संदीप कपिले, वाल्मिक लहिरे, निखील डांगे, आकाश डागा, नारायण लांडगे, गणेश लकारे, राजेंद्र आभाळे, राजेंद्र बोरावके, मनोज कडू, एकनाथ गंगूले, मुकुंद इंगळे, चंद्रशेखर म्हस्के, कार्तिक सरदार, सागर लकारे, चांदभाई पठाण, प्रताप गोसावी, नितीन शिंदे, विजय त्रिभुवन, विकी जोशी, सलिम पठाण, रुपेश वाकचौरे, विकास बेंद्रे, अंबादास वडांगळे सर आदींसह कार्यकर्ते सोशल डिस्टंसिंग पाळून उपस्थित होते.               

Leave a Reply

You cannot copy content of this page