दोन घास भुकेलेल्यासाठी उपक्रमाची सांगता-प्रा. शेटे

दोन घास भुकेलेल्यासाठी उपक्रमाची सांगता-प्रा. शेटे

Concluding remarks for two grass hungry-Pro. Shete

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated:Fir11June :18.30

कोपरगाव : गेली तीन महिने दोन घास भुकेलेल्यासाठी हा उपक्रम को-हाळे येथील श्री गणेश शैक्षणिक संकुलाचे संस्थापक प्रा. विजय शेटे,परीसरातील पालक व हितचिंतक यांनी राबविला होता. या उपक्रमाची सांगता झाली असल्याची माहिती प्रा. विजय शेटे यांनी दिली. 

प्रा.विजय शेटे म्हणाले,सामाजिक बांधिलकी जोपासताना मानवता धर्म निरपेक्ष व निस्वार्थी भावनेतून सामाजिक बांधिलकी जोपासताना गरजवंतांच्या  मदतीसाठी  खरीचा वाटा म्हणून दररोज तीनशे गरजूंना घरपोच जेवणाचे डबे  देऊन मानवतेचा धर्म निरपेक्ष व निस्वार्थी भावनेतून सामाजिक बांधिलकी जोपासताना गरजवंतांच्या  मदतीसाठी  खरीचा वाटा म्हणून उचलण्याचा  उपक्रम राबविला होता. या उपक्रमासाठी   कोपरगाव शहरातील बांधकाम व्यावसायिक मुकेश मंडल यांनी पन्नास हजारांची मदत केली पराग गॅस एजन्सी च्या मालकांनी दररोजच्या स्वयंपाकासाठी मोफत गॅस दिला कुणालाही मदतीचे आवाहन केले नाही, तरीही मदत करणारे हितचिंतक व पालकांची संख्या वाढत गेली. त्यामध्ये सतिष गुजराथी,तुषार डापसे, अर्जुन कोते ,वेदांत शेटे, प्रांजल शेटे, संतोष गमे , रवी सोनवणे  रामदास चौधरी ,प्रा.सोनवणे,संतोष शेटे , निळू रानशूर, शिवनाथ कोकाटे, प्रा.कीर्तने, सचिन भारस्कर ,संदीप चौधरी ,रवी चौधरी ,प्रमोद चांगले ,संजय शेटे, प्रा.हांगे, प्रा.कुदळे अनिता, प्रा.विशाल उंडे ,अमोल दिघे,बाळासाहेब गमे, नानासाहेब डांगे,सचीन डांगे ,उत्तम हेगडे ,कालेकर , सिद्धेश दौंड  ,सतीश गमे , बंटी तारगे , डॉ.झाडे ,आदित्य घाटगे,सिताराम वाकचौरे,संतोष डांगे,आप्पासाहेब शिंदे, प्रा.रियाज शेख ,प्रा.हाळनोर नवनाथ, जगताप  उज्जवला,चेतन मुर्तडक ,रवी मोगल,सचिन कानकाटे,सुनील हेमके यांनी मदत केली. कुणी डाळ- तांदूळ पोहोच केले, तर कोणी गहू, भाजीपाला,तेल आपल्या परीने या वस्तु दिल्यात व सर्वांचा उत्साह वाढविला.
       सदर डब्यात दिवसभराची भूक भागेल अशा दोन पोळ्या, मसालेभात व पातळ भाजीचा समावेश करून पदार्थ गरम राहतील याची दक्षता घेऊन डब्यांचे वितरण अविरतपणे केले. अन्न दानाच्या पवित्र कार्यास आपल्या पंचक्रोशीतील सर्व सहकारी, संस्था ,पदाधिकारी ,शासकीय पदाधिकारि व शेतकरी वर्ग यांनी जो मदतीचा हातभार दिला त्या सर्वांचे मी शिक्षण संस्थेच्या वतीने प्रा. शेटे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page