मराठा समाजाला आरक्षण द्या, राष्ट्रवादीची पंतप्रधानांना पत्राची मोहीम

मराठा समाजाला आरक्षण द्या, राष्ट्रवादीची पंतप्रधानांना पत्राची मोहीम

Give reservation to the Maratha community, NCP’s letter campaign to the Prime Minister

कोपरगाव :राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनी आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पंतप्रधान नरेद्र मोदी यांना पत्र पाठविण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून “एक पत्र मराठा युवकांच्या उज्वल भविष्यासाठी”  या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वतीने करण्यात आले.

मराठा समाजाने लोकशाही मार्गाने आरक्षण मिळावे यासाठी शांततेच्या मार्गाने ५८ मोर्चे काढले. त्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट होऊन सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे असून त्यासाठी कायद्यात बदल करणे अनिवार्य आहे. त्यासाठी केंद्र शासनाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने लक्ष घालुन मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी  मागणी या पत्रात करण्यात आली असून अशा आशयाचे पत्र राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पाठविण्यात आले. याप्रसंगी नवाज कुरेशी, संदीप कपिले, कार्तिक सरदार, सागर लकारे, शुभम शिंदे, संतोष दळवी, संदीप सावतडकर, ऋषिकेश खैरनार, महेश उदावंत, संदीप देवळालीकर, आकाश डागा, ऋतुराज काळे, भूषण निमसे, समीर बर्डे, स्वप्नील सोनवणे, शुभम भुजबळ आदी उपस्थित होते.             

Leave a Reply

You cannot copy content of this page