मुलाने आज्याच्या मदतीने जन्मदात्या बापाचा केला निर्घूण खून; मृतदेह ऊसाचे नालीत फेकून दिला
The son, with the help of his grandmother, brutally murdered the birth father; The body was dumped in a sugarcane drain
आरोपींना अटक, सहा दिवसांची पोलिस कोठडी, Accused arrested, six days in police custody
कोपरगाव क्राईम स्टोरी,Kopargaon Crime Story
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated:Sat12June :17.30
कोपरगाव : आजा आणि बाप यांच्यात नेहमी होणारे घरगुती भांडणाचे कारणावरून मुलाने आज्याच्या मदतीने जन्मदात्या वडिलाचा काहीतरी टनक शस्त्राने डोक्यात तसेच शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी मारहाण करून जबर जखमी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खून केला. त्यानंतर सुरेगाव ते कोळगाव थडी जाणारे कच्चा रोडवर संजय दामोदर निकम यांचे उसाचे शेताजवळील नालीत फेकून दिला. या खुनातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे अशी माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरेगाव परिसरात ही धक्कादायक आणि क्रूर घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलाला व आज्याला दोघांना अटक केली आहे.
बाबुराव छबुराव निकम ( वय ५१) असे खून झालेल्या वडिलाचे नाव आहे. तर सोनू उर्फ प्रफुल्ल बाबुराव निकम मुलाचे नाव असून सोपान लक्ष्मण कोपरे आजोबाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,बुधवारी (९ जुन) रोजीचे रात्री ९ वाजेच्या सुमारास ते दिनांक गुरूवारी (१० जुन) रोजीचे सकाळी ७ वाजेच्या दरम्यान सुरेगाव शिवारात सुरेगाव ते कोळगाव थडी जाणारे कच्या रोडवर संजय दामोदर निकम यांचे उसाचे शेताजवळील नालीत फिर्यादीचे मयत पती नामे बाबुराव छबुराव निकम यांचा खून झाला असून सोपान कोपरे व फिर्यादीचे पती यांचे नेहमी होणारे घरगुती भांडणाचे कारणावरून फिर्यादीची सवत नामे झुंबरबाई बाबुराव निकम यांचा मुलगा नामे सोनु ऊर्फ प्रफुल्ल बाबुराव निकम झुंबरबाई तिचे वडील सोपान लक्ष्मण कोपरे यांनी मिळून फिर्यादीचे मयत पती बाबुराव छबुराव निकम यांना काहीतरी टनक शस्त्राने डोक्यात तसेच शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी मारहाण करून जबर जखमी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारले आहे म्हणून सोनू उर्फ परफुल बाबुराव निकम , सोपान लक्ष्मण कोपरे दोन्ही राहणार सुरेगाव तालुका कोपरगाव यांच्याविरुद्ध मयताची पत्नी लताबाई बाबुराव निकम यांनी खून केल्याची तक्रार आहे म्हणून पोलीसांनी गुरनं. व कलम I-२०७/२०२१ भा द वि क ३०२,३२३,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे अशी माहिती
कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तपासी अधिकारी दौलतराव जाधव यांनी दिली.