कोपरगावात शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक प्रभागात वृक्षारोपण
Tree planting in every ward on the occasion of Shiv Sena’s Aditya Thackeray’s birthday in Kopargaon
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated:Sun13June :15.40
कोपरगाव: आदित्य ठाकरे यांचा आज १३ जून रोजी ३१ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांडून विविध उपक्रम राबवले जातात. मात्र, यंदा करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्टिवरवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.त्यामुळे कोणताही गाजावाजा न करता कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने नगर उत्तर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक प्रभागात वृक्षारोपण करण्यात आले असल्याची माहिती शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी दिली.
यंदा माझ्या वाढदिवसानिमित्त कोणताही कार्यक्रम, सोहळा करण्याचे टाळत आहे, असं आदित्य यांनी म्हटलं आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव शिवसेनेच्या वतीने सर्व प्रभागात वृक्षारोपण समारंभ “सांसे हो रही है कम आओ पेड लगाये हम ” हे ब्रीद वाक्य घेऊन करण्यात येणार आहे.
या स्तुत्य उपक्रमामुळे कोपरगाव शहरात जवळ पास सर्वच ठिकाणी वृक्षारोपण होणार असल्याने सर्व शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे व सर्व स्तरांतून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.फक्त झाडे लाऊन विसरून जाऊ नका तर त्या झाडांची निगा देखील राखा असे आवाहन जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी केले आहे.