नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर बलात्कार,
Rape of a woman who went to wash clothes on the river,
महिन्याभराने गुन्हा दाखल, आरोपी फरार The accused absconded after filing a case within a month
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated:Sun13June :18.30
कोपरगाव :तालुक्यातील सुरेगाव येथे महिनाभरापुर्वी अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव गावातील एका महिलेवर बलात्कार करून आरोपी पळुन गेला होता .
पीडित २४ वर्षीय महिला (१४ मे २०२१ ) रोजी सकाळी ९ ते १० वाजेच्या दरम्यान धुणे धुण्यासाठी गोदावरी नदीच्या कडेला गेली असता आलेल्या महिलेला एकटीला पाहून तेथून जाणारा आरोपी विजय चंदू जिरे रा. सुरेगाव हा फिर्यादीस दमदाटी करून बळजबरीने फिर्यादीचा हात धरून काटवणात घेऊन जाऊन मारहाण करून फिर्यादीवर बळजबरीने बलात्कार करून तो तेथून पळून गेला.
याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विजय चंदू जिरे रा.सुरेगाव ता.कोपरगाव याच्या विरुद्ध तब्बल महिन्याभराने शनिवारी (१२ जून) रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव व वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहेत.





