संजीवनी पाॅलीटेक्निक: १३७ मुलींना ५०,हजारापर्यंत शिष्यवृत्ती ; राज्यात अव्वल – अमित कोल्हे

संजीवनी पाॅलीटेक्निक: १३७ मुलींना ५०,हजारापर्यंत शिष्यवृत्ती ; राज्यात अव्वल – अमित कोल्हे

एन. बी. ए. मानांकनाचे फलित

कोपरगांवः
संजीवनी के.बी. पी. पाॅलीटेक्निकला एन. बी. ए. मानांकनामुळे येथे शिकणा-या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या संवर्गनिहाय सर्व शिष्यवृत्या मिळत आहेत, परंतु याही व्यतिरीक्त भारत सरकारच्या विविध शिष्यवृत्यांचा लाभ येथिल मुलींना मिळत आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधिल १३७ मुलींना प्रत्येकी रू ५०,००० पर्यंत शिष्यवृत्ती मंजुर झाली असुन त्यापैकी प्रथम वर्षाच्या २९ मुलींच्या बॅन्क अकौंटमध्ये शिष्यवृत्ती जमा होेत असल्याचे पत्र संस्थेस प्राप्त झाले असल्याची माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. राज्यात संजीवनी पाॅलीटेक्निक हे सर्वात जास्त शिष्यवृत्ती मिळविणारे एकमेव पाॅलीटेक्निक ठरले आहे, असेही ते म्हणाले.

 

पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की भारत सरकारच्या वतीने प्रथम वर्षाच्या मुलींसाठी देशातील एकुण पाॅलीटेक्निक व डी. फार्मसी मधिल १९२० लाभार्थी मुलींची यादी जाहीर झाली असुन यात महाराष्ट्रातील २१६ मुलींचा समावेश आहे तर अहमदनगर जिल्ह्यातील फक्त ३६ मुलींचा सहभाग असुन यात संजीवनी पाॅलीटेक्निकच्या २९ मुलींचा सहभाग आहे. महाराष्ट्रातील एकुन पाॅलीटेक्निक व डी. फार्मसी संस्थांच्या तुलनेत संजीवनीच्या मुलींची सर्वात जास्त संख्येने मेरीट वर निवड झाली आहे. ग्रामीण भागातील मुला मुलींना तांत्रिक शिक्षण देवुन त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी माजी मंत्री श्री शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी पाॅलीटेक्निकची स्थापना केली. संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. नितीनदादा कोल्हे यांनी जास्तीत जास्त विध्यार्थ्यांना नोकऱ्या कशा मिळतील यावर लक्ष केंद्रीत केले. मागील ३५ वर्षांच्या कालखंडात हजारो अभियंते तयार झाले. आज ते देश परदेशात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत तर काही यशस्वी उद्योजक आहेत.

 

सध्याच्या परीस्थितीमध्ये काही पालकांना आपल्या पाल्याचा शैक्षणिक खर्च भागविणे अवघड जाते. अशा वेळी संजीवनी पाॅलीटेक्निकच्या प्रयत्नाने विध्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्या मिळवुन देण्यासाठी प्रयत्न केले जातात. संजीवनी मधिल प्रत्येकी रू ५०,००० पर्यंतच्या स्काॅलरशिपसाठी निवड झालेल्या प्रथम वर्षाच्या मुलींमध्ये साक्षी पोपट बारे, शबनम पठाण, स्नेहल शिवाजी वहाडणे, गौरी बाबासाहेब चांदर, अनुक्षा चव्हाण, सावरी बापुसाहेब जावळे, ऋचिता गाडे, वैष्णवी दिपक खिंडारे, संध्या म्हैस, कल्याणी रामदास भवर, श्रृती लक्ष्मण खंडागळे, अवांतिका सतिश भोसले, रेणुका आसणे, सृष्टी नानासाहेब शेवाळे , स्वेता आहेर, गायत्री आढाव, तन्वी निरंजन शिवरकर, सायली निलेश सोनवणे, रेशमा भावसार, साक्षी विजय वक्ते, तेजश्री कैलास काळे, साक्षी सतिश भगत, शेहल वाबळे, प्राजल राहुल जगताप, अंकिता किरण सोनवणे, प्रेरणा सुनिल पेटारे, हेमलता वाघ, दिया विलास पवार व आकांक्षा रविंद्र त्रिभुवन यांचा समावेश आहे. या सर्व मुलींचे व त्यांच्या पालकांचे प्राचार्य ए. आर. मिरीकर व विभाग प्रमुखांनी अभिनंदन केले आहे. पालकांनीही त्यांच्या मुलींना शिष्यवृत्यांचा लाभ होत असल्याने समाधान व्यक्त केले.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page