जनतेच्या स्मरणात राहणारा विकास करून दाखवणार -आ. आशुतोष काळे

जनतेच्या स्मरणात राहणारा विकास करून दाखवणार -आ. आशुतोष काळे

Development will be shown in the memory of the people. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated:Sun13June :20.00

 कोपरगाव : लोकप्रितिनिधी येतात आणि जातात मात्र कोणत्या लोकप्रतिनिधींनी कोणती विकासकामे केली याचा हिशोब जनतेकडे असतो. काळे परिवाराला मतदार संघातील जनतेने ज्या ज्यावेळी सेवा करण्याची संधी दिली त्या त्यावेळी मतदार संघाचा विकास झाला आहे.हा विकासाचा वारसा डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या स्मरणात राहील असा मतदार संघाचा विकास करून दाखवणार असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी जवळके ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी केले.

  आ. काळे म्हणाले,  माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात विरोधी पक्षाचे आमदार असतांना देखील गोदावरी नदीवर बांधलेले पूल व बांधलेल्या विविध शासकीय इमारती त्यांच्या विकासकामांची साक्ष देत आहेत. जवळके व परिसरातील गावांसाठी जीवनवाहिनी असलेली उजनी चारी सिंचन योजना माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात पुनर्जीवित करून २०१४ पर्यंत नियमितपणे चालू ठेवली असल्याचे नमूद केले. त्याप्रमाणे मी देखील जवळके व परिसरातील गावांचे विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असून नागरिकांना अपेक्षित असणारे विकासकामे करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.        

चौकट :-आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्याने मार्गी लावत जवळकेचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र विकासकामात नेहमीच राजकारण करणाऱ्या विरोधकांनी राजकारण करून कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याच्या बातम्या प्रसिद्ध करून जवळकेच्या विकासलाच विरोध केला असल्याचे सांगितले.मात्र कितीहि अडथळे आले तरी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळकेचा विकास थांबू देणार नाही. – सरपंच बाबुराव थोरात             

यावेळी सभापती सौ.पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, संचालक सुनील शिंदे, सचिन रोहमारे, आनंदराव चव्हाण, सरपंच बाबुराव थोरात, राहुल रोहमारे, रोहिदास होन, देवेन रोहमारे, नंदकिशोर औताडे, किसन पाडेकर, युवराज गांगवे, ज्ञानेश्वर गव्हाणे, विजय कोटकर, सिकंदर इनामदार, राजेंद्र औताडे, राहुल जगधने, शिवाजी थोरात, लक्ष्मण थोरात, गणेश थोरात, बाळासाहेब गव्हाणे, उमेश देवकर, अशोक नेहे, नाना नेहे, आनंद भडांगे, सौ.राजश्री थोरात, सुधाकर थोरात, जगन्नाथ शिंदे, राजेंद्र औताडे, गोकुळ पाचोरे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, अभियंता उत्तमराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.            

Leave a Reply

You cannot copy content of this page