भविष्यात घटना टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षातून वेळेत मदत करा : आशुतोष काळे
Help in time from Disaster Management Room to prevent future incidents: Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated:Mon14June :18.00
कोपरगाव :तालुक्यात मागील काही वर्षात अनेकवेळा अतिवृष्टीमुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले होते. अशा आपत्तीत जीवित हानी झाली नाही मात्र भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून आपत्ती काळात नागरिकांना वेळेत योग्य ती मदत करा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी तहसील कार्यालय येथील आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा शुभारंभी
प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
आ. काळे म्हणाले की, नैसर्गिक संकटांपासून होणारे नुकसान होऊ नये यासाठी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून चांदेकसारे, ब्राम्हणगाव, धोत्रे, शहाजापूर, हिंगणी आदी ठिकाणी घडलेल्या आपत्तींची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पावसाचे साचलेल्या पाण्याचा जावून आपत्कालीन परिस्थिती निचरा होण्यासाठी प्रशासनाने जलनि:सारण विभागाला योग्य त्या सूचना द्याव्यात. आवश्यक त्या ठिकाणी पावसाळ्यात पाण्याचा निचरा करणाऱ्या ओढ्या, नाल्यांची दुरुस्तीची कामे हाती घेवून वेळेत पूर्ण करावी अशा सूचना दिल्या.
मागील काही वर्षापासून नागरिकांना अतिवृष्टी, महापूर अशा नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. त्यावेळी निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे नागरिकांचे अतोनात हाल होवून आर्थिक नुकसान झाले आहे. भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन कक्षाची निश्चितपणे मोठी मदत होणार असल्याचे आ. काळे यांनी सांगितले.
यावेळी प्रांताधिकारी गोविंदराव शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, सौ. पौर्णिमा जगधने, अर्जुनराव काळे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, चेअरमन गोरक्षनाथ जामदार, दिलीप शिंदे, धरमशेठ बागरेचा, शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, हाजीमेहमूद सय्यद, सुनील शिलेदार आपत्ती व्यवस्थापन पथकातील कर्मचारी आदी उपस्थित होते.