आमदार काळेंच्या नियोजनामुळेच कोरोनावर वेळीच नियंत्रण – गोविंद शिंदे

आमदार काळेंच्या नियोजनामुळेच कोरोनावर वेळीच नियंत्रण – गोविंद शिंदे

Timely control over Corona due to MLA Kale’s planning – Govind Shinde

कोपरगावात कोरोना योद्ध्यांचा सत्कार Corona warriors felicitated at Kopargaon

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated:Mon14June :19.20

कोपरगाव : मागील तीन महिन्यात दररोज शेकडो बाधित रुग्ण व रुग्णांचे मृत्यूंचे प्रमाण देखील वाढले होते. अशा कठीण परिस्थितीत आ. आशुतोष काळे यांनी उत्तर नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे कोविड केअर सेंटर उभारून प्रशासनाला वेळेवर सर्व प्रकारची मदत करून केलेल्या योग्य नियोजनामुळे कोपरगाव तालुक्यात कोरोनावर वेळीच नियंत्रण मिळविता आले असल्याचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी कोरोना योद्ध्यांचा सत्कार प्रसंगी सांगितले.

यावेळी पोलीस उपअधीक्षक संजय सातव, तहसीलदार योगेश चंद्रे, पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता दिनेश चावडा, महात्मा गांधी ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, सरपंच प्रतिनिधी सूर्यभान कोळपे, डॉ. दीपक पगारे, डॉ. कुणाल घायतडकर, डॉ. राजेंद्र रोकडे, पत्रकार , खाजगी कोविड केअर सेंटरचे प्रतिनिधी, परिचारिका प्रतिनिधी, आशा सेविका प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका प्रतिनिधी, रुग्णवाहिका चालक प्रतिनिधी, सफाई कामगार प्रतिनिधी, यांच्यासह आरोग्य विभाग, कोपरगाव नगरपरिषद, महसूल विभाग, पंचायत समिती आदी विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. प्रांत गोविंद शिंदे म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उग्र रूप धारण केल्यामुळे बाधित रुग्णांची संख्या वाढली व त्याचबरोबर ऑक्सिजन बेड, रेमडीसीवीर इंजक्शन व ऑक्सिजनची देखील टंचाई जाणवत होती. अशा परिस्थितीत आ. आशुतोष काळे प्रशासनाच्या मागे खंबीरपणे उभे राहिल्यामुळे व केलेल्या मदतीमुळे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले कि, यावर्षी मात्र कोपरगावमध्ये चार कोविड केअर सेंटर असून यामध्ये दोन डेडिकेटेड कोविड सेंटर आहे. ५०० बेडचे जम्बो कोविड सेंटर व एसएसजीएम महाविद्यालयात १०० ऑक्सिजन बेडची व्यवस्था केल्यामुळे परिस्थितीवर लवकर नियंत्रण मिळविणे शक्य झाले यामध्ये आ. काळे यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले.

चौकट :-कोरोना बाधित रुग्णांसाठी कोरोना योद्ध्यांनी योगदान दिले ते विसरून चालणार नाही.अजोड आहे. त्यांच्या बळावरच आपण जिल्ह्यात सर्वात अगोदर कोरोनावर नियंत्रण मिळवू शकलो.त्या त्यागाचा यथोचित सत्कार व्हावा या उद्देशातून हा कार्यक्रम आयोजित केला आहे. नागरिकांनी ज्या वेळी लसीकरणासाठी बोलाविण्यात येईल त्यावेळी आपले लसीकरण करून घ्यावे.-आ. आशुतोष काळे

याप्रसंगी राष्ट्रवादीचे पदाधिकारी सर्व नगरसेवक, पदाधिकारी, पत्रकार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक उपसभापती अर्जुनराव काळे यांनी केले. सूत्रसंचालन अरुण चंद्रे यांनी केल तर आभार सुधाकरराव रोहोम यांनी मानले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page