रोहित्रे द्या, वीज समस्या सोडावा : वीज कार्यालयात माजी आमदार सौ. कोल्हे यांचा ठिय्या

रोहित्रे द्या, वीज समस्या सोडावा : वीज कार्यालयात माजी आमदार सौ. कोल्हे यांचा ठिय्या

Give Rohitra, power problem should be solved: Former MLA Mrs.   Kohle’s seat

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Tue15June :17.20

कोपरगाव  : सातत्याने खंडीत होणारा व कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठा प्रश्नी महिनोंमहिने मागणी करूनही विदयुत रोहित्र दिले जात नसल्याने वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांना जाब विचारत संतप्त झालेल्या माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी मंगळवारी (१५) रोजी  कोपरगाव महावितरणच्या कार्यालयात धडक देऊन ठिय्या आंदोलन केले. नवीन रोहित्रे  तातडीनं बसवा , तसेच रोहित्र वाटपातील दुजाभाव खपवून घेणार नाही असा इशारा संतप्त माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी अधिकारी यांना दिला.

यावेळी  महावितरणने ग्राहकांची फसवणूक करू नये. आम्ही बिले भरतो. तुम्हाला जर सेवा देता येत नसेल तर कार्यालय बंद करा तातडीने विद्युत रोहित्र बसवा अन्यथा आम्ही येथून जाणार नाही अशी भूमिका उपस्थित शेतक- यांनी घेतली.

कोरोनामुळे शेतकरी मोठया आर्थीक संकटातून जात आहे. बीले भरूनही विदयुत रोहित्रा अभावी वीज वितरण कंपनी या शेतकऱ्याला आर्थीक खाईत लोटण्याचे काम करत असल्याबद्दल उपस्थित सहायक अभियंता दिनेश चावडा यांना सौ. कोल्हे यांनी चांगलेच धारेवर धरले.

यावेळी त्या  म्हणाल्या , सध्या वीजेचा खेळखंडोबा करून शेतक-यांच्या भावनेशी खेळ सुरू आहे. सध्या पावसाने ओढ दिली असुन विहीरीच्या पाण्यावर जनावरांच्या चा-यांसह इतर पिकांची लागवड केली आहे. आर्थीक परिस्थिती नसतांनाही पिके उभी केली, परंतु वीज वितरण कार्यालयाच्या ढिसाळ नियोजनामुळे हाती आलेली पिके वाया जात आहे.   त्याचप्रमाणे वारंवार वीजबिले भरण्याची मागणी करून मनस्ताप देण्याचे काम केले जात असल्याचा आरोप सौ. कोल्हे यांनी केला आहे.

या परिस्थितीमध्ये वीज मंडळ त्यांना दुजाभावाची वागणुक देउन त्यांच्या भावनांशी खेळत आहे. ही अन्यायकारक भुमिका आम्ही कदापिही खपवून घेणार नाही. विदयुत रोहित्र तातडीने दुरूस्त करून शेतक-यांना न्याय दयावा,अन्यथा वीज  वितरण मंडळाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सौ कोल्हे यांनी शेवटी दिला.

चौकट

ब्राम्हणगाव येथील वाकचौरे डी.पी. गेल्या एक महिन्यापासून जळालेली आहे. वारंवार मागणी करूनही दुरूस्ती केली जात नाही, यामुळे येथील नागरीकांसह जनावरेही पाण्यापासून वंचित आहे. अनेक कुटूंबांच्या घरातील लाईटही बंद असल्याने शेतकरी बांधवामध्ये असंतोषाचे वातावरण आहे. राज्याचे उर्जा राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता श्री सांगळे, कार्यकारी अभियंता श्री मुळे यांचेशी संपर्क साधून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विदयुत पुरवठा तातडीने सुरळीत करून नादुरूस्त विदयुत रोहित्र तातडीने बसवून देण्याची मागणीही सौ. कोल्हे यांनी यावेळी केली.

Leave a Reply

You cannot copy content of this page