कोपरगाव बाजार समितीच्या सभेत दूध दरवाढीचा ठराव – संभाजी रक्ताटे

कोपरगाव बाजार समितीच्या सभेत दूध दरवाढीचा ठराव – संभाजी रक्ताटे

Milk price hike resolution in Kopargaon market committee meeting – Sambhaji Raktate

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Tue 22June :18.44

कोपरगाव : राज्यातील घटत्या दूध दरावरुन कोपरगाव उत्पन्न बाजार समितीने आता आक्रमक पवित्रा घेतला असूनबाजार समितीने आपल्या निवेदनात म्हटलं,“लॉकडाऊनचा गैरफायदा घेत खासगी दूध कंपन्या व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर प्रति लिटर १० ते १५ रुपयांनी पाडले असून ग्राहकांसाठी मात्र विक्रीदर तेच ठेवून दूध उत्पादक व ग्राहक यांची प्रचंड प्रमाणात लूट होत आहे या प्रश्नावर अनेक ठिकाणी निदर्शने होऊन तहसीलदार यांना निवेदने देण्यात आलेली आहेत. या प्रश्नी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बाजार समितीच्या सभेत दूध दरवाढीचा ठराव करण्यात आला असल्याची  माहिती सभापती संभाजी रक्ताटे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

लॉकडाऊन पूर्वी शेतकऱ्यांना प्रति लिटर दुधासाठी ३० ते ३८ रुपये दर मिळत होता. लॉकडाऊन जाहीर होताच टप्प्याटप्प्याने हे दर संघटितरीत्या पाडण्यात आले. ते २० रुपये प्रति लिटरने खरेदी करून ४५ रुपये प्रतिलिटर ग्राहकांना विकत आहे प्रमाणे आहेत. खासगी दूध कंपन्या व सहकारी दूध संघांनी संघटितरीत्या लॉकडाऊनचा बाऊ करून हे दर पाडले. असा आरोप या सभेत करण्यात आला आहे. दुधातील मिळणाऱ्या पैशातून पशुखाद्याचे ही पैसे भागविले जात नाही त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे. शेतीचा दूध जोडधंदा अडचणीत आला आहे. या प्रश्नी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बाजार समितीच्या सभेत दूध दरवाढीचा ठराव करण्यात आला आहे. असेही रक्ताटे यांनी सांगितले आहे, तेंव्हा  कोरोना च्या नावाखाली दूध उत्पादक शेतकर्‍यांची होणारी लूट सरकारने थांबवावी व दूध उत्पादकांना न्याय देऊन दूध दरवाढ करावी, अशी विनंती शेवटी निवेदनात करण्यात आली आहे या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार व पणन मंत्री तसेच दुग्ध विकास मंत्री सुनील छत्रपाल केदार यांना पाठविण्यात पाठविण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page