डिझेलचा टँकर पलटी चालक व दुचाकी स्वारसह दोन ठार
Two killed, including a diesel tanker overturned driver and two-wheeler rider
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Tue 22June :19.50
कोपरगाव : नागपूर-मुंबई महामार्गावर दहेगाव बोलका शिवारात हॉटेल द्वारकमाई नजीक डिझेलचा टँकर मंगळवारी (२२) रोजी एक वाजेच्या सुमारास पलटी झाला आहे. त्या अपघातात एक मोटर सायकल चालक व टँकर चालक दोघेही ठार झाले असून दोघांचीही नावे समजू शकली नाहीत .
ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी दिलेली अधिक माहिती अशी सदरचा टॅंक ओव्हरटेक करताना हा अपघात झाला . यात एक मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाला उपचार सुरू असताना तो मयत झाला आहे तर टँकर खाली दबल्याने टँकर चालकांचा ही मृत्यू झाला आहे.
दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला उपचार सुरू असताना तो मयत झाला आहे तर टँकर खाली दबल्याने टँकर चालकांचा ही मृत्यू झाला आहे. कोपरगावकडून वैजापूरच्या दिशेने जाणारा टँकर क्रमांक एम एच ४६ बी बी ३०६६ हा बैलगाडीला ओव्हरटेक करताना पलटी झाला. सदरचा टॅंकर भरधाव वेगात असल्याने तू टँकर चालकाला कंट्रोल करता आला नाही यात एक दुचाकीस्वार जखमी झाला असून त्यास कोपरगाव येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरू झाले उपचार सुरू असताना मृत्यू पावला आहे तर टँकर खाली दबल्याने टँकर चालकाचा ही मृत्यू झाला आहे पलटी झालेला टॅंकर काढण्याचे काम प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आले असून मुंबई नागपूर महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली . मयत झालेल्या दुचाकीस्वार व टँकर चालकाचे नाव मात्र समजू शकले नाही घटनास्थळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचा व नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंब दाखल झाले असून फोम द्वारे टँकर वर फवारणी करण्यात आली दोन रुग्णवाहिकाही तातडीने दाखल झाल्या आहेत. संबंधित कंपनीच्या व्यवस्थापनावर या अपघाताबाबत कळविले असून त्यांचे तंत्रज्ञ दहेगाव बोलका शिवारात पोहोचत आहे. टँकर उभा करण्यासाठी क्रेन ही मागवण्यात आल्या होत्या.