खा. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगावात वृक्षारोपण
Eat. Tree planting in Kopargaon on the occasion of Supriya Sule’s birthday
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Wed 30June :17:47
कोपरगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या संसदरत्न खा. सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शना खाली कोपरगाव शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
खा. सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसा निमित्त दरवर्षी कोपरगाव शहर व तालुक्यात विविध ठिकाणी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. चैताली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना केंद्रस्थानी ठेवून महिलांसाठी आरोग्य शिबीर, विविध क्षेत्रातील नामवंत महिलांचे व्याख्यान तसेच रांगोळी, पाक कला अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. मात्र मागील वर्षापासून वैश्विक कोरोना महामारीमुळे सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी शासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. कोपरगाव शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करून खा. सौ. सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा, नगरसेविका सौ. प्रतिभा शिलेदार, सौ.माधवी वाकचौरे, सौ. मायादेवी खरे, सौ. रश्मी कडू, सौ.वैशाली भगत, सौ. गौरी पहाडे, सौ.शीतल लोंढे, सौ.कोमल राठी, सौ.धनश्री देवरे, सौ.कीर्ती पोरवाल, सौ.सुवर्णा टेके, सौ.योगिता साळी आदी उपस्थित होत्या.