आम्हाला एकत्रितच “लसीकरण ‘ करावे ! रिक्षा संघटनेच्या मागणीची दखल ;लसीकरण सुरू

आम्हाला एकत्रितच “लसीकरण ‘ करावे ! रिक्षा संघटनेच्या मागणीची दखल ;लसीकरण सुरू

१ ल्या दिवशी  ५० जणांना कोवैक्सिन लस दिली-डॉ कृष्णा फुलसौंदर

 

Notice the demand of the rickshaw association We should do “vaccination” together!

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Thu 1July :15:00

कोपरगाव : आम्हाला एकत्रितच “लसीकरण ‘ करावे ! रिक्षा संघटनेच्या मागणीची तातडीने दखल घेण्यात आली असून त्यांनी रजिस्ट्रेशनसह दररोज पन्नास रिक्षाचालकांचे एकत्रित लसीकरणाची परवानगी दिल्याने लसीकरणाची प्रक्रिया आज गुरुवार दिनांक (१ जुलै) रोजी सकाळी ११ वाजेपासून रिक्षा संघटनेच्या कार्यालयातून सुरू झाली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव यांनी दिली आहे.

याबाबत माहिती देताना कैलास जाधव म्हणाले, कोरोना (Corona) लसीकरणाच्या (Covid-19 Vaccination) नव्या मोहिमेमध्ये शासनाने विविध प्रकारचे बदल केले आहेत. त्यानुसार कोपरगाव तालुका ऑटोरिक्षा संघटनेने दोन दिवसापूर्वी ‘आम्हाला एकत्रितच “लसीकरण ‘ करावे’, अशी मागणी तहसीलदार योगेश चंद्रे व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय तालुका अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांच्याकडे केली होती.

यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र सालकर म्हणाले,राज्यासह शहर व तालुक्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याचं चित्र आहे. लसीकरण जेवढे जास्त होईल, तेवढे कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांना बळ मिळेल, एकतर रिक्षाचालक हा रस्त्यावर वेगवेगळे प्रवासी घेऊन इकडून तिकडे ये जा करीत असतो कोण कोठून आले याची त्याला कल्पना नसते तेव्हा रिक्षाचालकांच्या दृष्टीने कोरोना लसीकरण करणे महत्त्वाचे आहे असे सांगितले.

रिक्षा संघटनेचे कार्यालयात सभासद रिक्षा चालक मालक यांच्या नावनोंदणीस सुरुवात करण्यात आली याकामी संघटनेचे संस्थापक, शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या सुचनेप्रमाणे शहरप्रमुख कलविंदर दडियाल यांनी विशेष मदत केली.
तहसीलदार योगेश चंद्रे व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय तालुका अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, पत्रकार ,न्युज चॅनल, पोर्टल न्युज यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार टॅक्सी सेना अध्यक्ष अस्लम शेख यांनी व्यक्त केले.
रिक्षाचालकांच्या लसीकरण कामी पापा तांबोळी, प्रकाश शेळके, अनिल वाघ, रवींद्र वाघ, संजू पवार, रणजीत पंडोरे आदी सर रिक्षा सभासदांनी व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

You cannot copy content of this page