कोरोनातील डॉक्टरांचे योगदान न विसरण्यासारखे- आ.आशुतोष काळे

कोरोनातील डॉक्टरांचे योगदान न विसरण्यासारखे- आ.आशुतोष काळे

Not to forget the contribution of doctors in Corona – MLA Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Thu 1July :18:00

कोपरगाव : शहरातील गौतम बँकेच्या सभागृहात गुरुवारी डॉक्टर्स डे निमित्त आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील ज्येष्ठ डॉक्टर व कोरोना काळात आरोग्य केंद्रात सेवा देणा-या सर्व डॉक्टरांचा शाल व पुष्पगुच्छ देवून त्यांचा सन्मान  केला.  कोरोना संकटातील डॉक्टरांचे योगदान न विसरण्यासारखे आहे. हे योगदान समाज कधीच विसरू शकणार नाही अशा शब्दात आ. आशुतोष काळे यांनी डॉक्टरांचा गौरव केला.

यावेळी डॉ. चंद्रशेखर आव्हाड, डॉ. दत्तात्रय मुळे,डॉ. तुषार गलांडे, डॉ. आतिष काळे, डॉ. दिपक पगारे, डॉ. राजेंद्र रोकडे, डॉ. योगेश कोठारी, डॉ. गणेश ठोंबरे, डॉ. अमोल अजमेरे, डॉ. रवींद्र गायकवाड, डॉ. राजेश माळी डॉ. योगेश लांडे, डॉ. मयुर तिरमखे, डॉ. रमेश सोनवणे, डॉ. नरेंद्र गायकवाड, डॉ. राकेश भल्ला, डॉ. हर्षद आढाव, डॉ. शांताराम आढाव, डॉ. शिवाजीराव रोकडे, डॉ. कुणाल घायतडकर, डॉ. भाग्यश्री घायतडकर, डॉ. वर्षा रोकडे, डॉ. दिपाली आचारी, डॉ. प्रसाद काळवाघे, डॉ. स्वप्नील सोनवणे, डॉ. सालिया पठाण, डॉ. झिया शेख डॉ. अमण रासकर, डॉ. तेजस सोमासे, आदी डॉक्‍टर्स उपस्थित होते. आ. आशुतोष काळे म्हणाले की, तिसरी लाट येण्याचे संकेत देण्यात आले आहे.त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लॅटची रुग्णांसाठी ५० ऑक्सिजन बेड कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या मदतीने २५ मीटर क्यूब ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारलेला असून ९० जम्बो सिलेंडर ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. आजपर्यत सर्व डॉक्टरांनी नागरिकांना आरोग्यसेवा देतांना जे सहकार्य केले ते सहकार्य यापुढे देखील ठेवावे असे आवाहन करून सर्व डॉक्टरांचे आभार व्यक्त करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सुधाकरराव रोहोम, पद्माकांत कुदळे, गोरक्षनाथ जामदार, धरमशेठ बागरेचा, डॉ. अजय गर्जे, सुनील गंगूले, चारुदत्त सिनगर,  नवाज कुरेशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. फोटो ओळ- “डॉक्टर्स डे” निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना आ. आशुतोष काळे .

Leave a Reply

You cannot copy content of this page