अल्टिमेटम डावल्याच्या निषेधार्थ मनसे कडून वीज बिलांची होळी

अल्टिमेटम डावल्याच्या निषेधार्थ मनसे कडून वीज बिलांची होळी

 

माफीचे गाजर दाखवून खिसा कापला – मनसे

कोपरगाव :

 

तीन महिन्याचे लाईट बिल माफ करावे, किंवा मागिल युनिट प्रमाणे बिल आकारण्यात यावे. या मागणीसाठी कोपरगाव मनसेच्यावतीने वीज कंपनीला आठ दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला होता. परंतु कंपनीने अल्टिमेटम पाळला नाही, याच्या निषेधार्थ संतप्त मनसे कार्यकर्त्यांच्या वतीने बुधवारी सकाळी आठ वाजता वीज कंपनीच्या कार्यालयासमोर वाढीव वीज बिलांची होळी केली असल्याची माहिती मनसेचे शहराध्यक्ष सतीश काकडे यांनी दिली.

Google Images

 

 

देशात कोरोनाचे संकट असताना लाॅकडाऊन करण्यात आले. या लाॅकडाऊन मध्ये शासनाचे नियम पाळत सर्व जनता घरात बसून होती.या बंदच्या काळात वीज बिले वाटण्यात आली नाही. रिडिंग घेतले नाही व तीन महिन्याचे एकत्रित बिल देण्यात आले आहे. विज माफीचे गाजर दाखवून सरासरी बिलाच्या नावाखाली ज्यादा दराची वीज बिले देऊन नागरिकांचा खिसा कापला. यामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत आला आहे परंतु अव्वाच्या सव्वा बिले आकारणाऱ्या वीज कंपनीला काहीही फरक पडला नाही.आठ दिवसाची मुदत देऊनही विज कंपनीने काही केले नाही वीज कंपनीच्या या संवेदनाशून्य कारभाराचा निषेध करीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (८जुलै) रोजी सकाळी आठ वाजता वीज कंपनीच्या कार्यालयासमोर वीज बिलांची होळी केली.

यावेळी मनसे शहराध्यक्ष सतिश काकडे , मा. तालुकाध्यक्ष अलिम शहा, उपशहराध्यक्ष अनिल गाडे, विजय सुपेकर ,रघुनाथ मोहिते , संजय चव्हाण , संजय जाधव बंटी सपकाळ नितिन त्रिभुवन जावेद शेख सचिन खैरे सागर महापुरे आनंद परदेशी संजय जाधव, बापू काकडे, नवनाथ मोहिते, या मनसे कार्यकर्त्यांसह नागरिक हजर होते आली.

चौकट
मनसेच्या विज बिल होळीला शहरातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद देत आपली वीज बिले मनसे कार्यकर्त्यांच्या स्वाधीन केली. यावेळी वाढीव बिलामुळे वीज कंपनी बद्दल नागरिकांच्या मनात असलेला रोष व खदखद बाहेर पडताना दिसत होती. या गोष्टीचा वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page