ब्राम्हणगावच्या कांदा व्यापाऱ्यांची साडेसोळा लाखाची फसवणूक
Fraud of Rs 16.5 lakh from onion traders of Bramhangaon
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Fri 2July :11:00
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील स्थानिक कांदा व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेल्या कांद्याचे १६ लाख ६१ हजार ६५० रूपये न दिल्याने कोपरगाव शहर पोलिसांनी संबधित कांदा खरेदीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
ब्राम्हणगाव येथील कांदा व्यापारी कैलास भिमराज माकुणे (४५)यांच्या कडून पुणतांबा फाटा, कोकमठाण ता. कोपरगाव येथुन सारवनन चेट्टीयार (रा. गोपालपुरम, ता. पोलाची जि. कोईमतुर राज्य – तामीळनाडु) यांनी १३मे २१ रोजी पासुन ते आज रोजी पावेतो वारंवार यातील आरोपी याने फिर्यादीचा विश्वास संपादन करुन त्यांचेकडुन १६ लाख ६१ हजार ६५० रुपये कांदा घेवुन त्यांना कांद्याचे पेसे न देता विश्वासघात करुन फसवणुक केली आहे. म्हणून माकोणे यांनी कोपरगाव शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी १जुलै रोजी रात्री २०.४७ वाजता गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव पोलिसात दाखल केलेल्या फिर्यादीवरून सारवनन चेट्टीयार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.पोलीस प्रभारी अधि. पो.नि. वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पो.स.ई. बी. सी. नागरे हे करीत आहेत.