जीवे मारण्याच्या उद्देशाने तरूणाचे अपहरण
Kidnapping of a youth with intent to kill
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Fri 2July :13:00
कोपरगाव : कामावरून काढून टाकले होते याचा राग मनात धरून पिकअपव्हॅनमध्ये घालून तरूणाचे अपहरण केले. त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याला घेऊन गेले. गुरूवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये चेतन बाप्पू आसणे व केशव बापू आसने( दोघेरा. पढेगाव ता कोपरगाव ) यांचा समावेश आहे. आरोपीचे घराजवळ पढेगाव येथून अपहरण करण्यात आले होते.
याबाबत माहिती अशी की, गुरूवारी (१ जुलै रोजी) रात्री ९ ते ९.३० वा.चे दरम्यान आरोपीच्या घराजवळून
चेतन बाप्पू आसणे याची फिर्यादी
सुनिता सोन्याबापु मलिक (५५) घरकाम रा. कासली हिचे सुनेवर वाईट नजर आहे. म्हणून त्यास कामावरून काढून टाकले होते. याचा राग मनात धरून यातील आरोपी चेतन बाप्पू आसणे व केशव बापू आसने या दोघांनी सुनिता मलिक हिचा मुलगा महेश सोन्याबापु मलिक (३२) यास मारहाण करून पिकअप गाडीत टाकून जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याचे अपहरण केले आहे.
याप्रकरणी सुनिता सोन्याबापु मलिक
हिच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुरनं. व कलम I-२४९/२०२१ भा. द. वि. क. ३६४,३२३,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुरेश आव्हाड पुढील तपास करीत आहे.