खासदार उन्मेष पाटील यांनी घेतली बिपीन कोल्हेची सदिच्छा भेट
MP Unmesh Patil Sadiecha Bhet on Bipin Kolhe
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Fri 2July :17:00
कोपरगाव : माजी आमदार अनिल आहेर यांच्या चिरंजीवांच्या विवाह सोहळयावरून येताना जळगाव भाजपाचे खासदार उन्मेष पाटील यांनी गुरूवारी (१ जुलै) रोजी संजीवनी उदयोग समूहाचे प्रमुख बिपीन कोल्हे यांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी देशातील एकमेव विवीध वैशिष्ट्यांनी समृद्ध सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आणि संजीवनी शैक्षणीक संकुलांची पाहणी केली. या वेळी तासभर झालेल्या चर्चेत श्री. पाटील यांनी देशातील एकमेव इथोनाल प्रकल्प, सॅनिटायझर, पॉरासिटोमॉल औषधीं बनविणारा सहकारातील पहिला कारखाना, कोरोना महामारीत जनतेची रामायणात भगवान हनुमानाने आणलेल्या संजीवनी औषधी प्रमाणे पंचक्रोशीतील हजारो लोकांची सेवा करणारा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना आहे, सत्याग्रही शेतकरी नेते.व या परिसराचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांच्या जीवनप्रवासाची त्यांनी माहिती घेतली. अतिशय प्रेरणादायी वाटचाल करताना उभारलेला कारख्यान्यात सर्व विभागांना भेटी दिल्या याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले . संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी त्यांचे फेटा बांधून केलेले स्वागत केले.संजीवनी परिवाराचा विस्तार अधिकाधिक लोकाभिमुख व्हावा अशी सदिच्छा यांनी व्यक्त केली, शेवटी बिपिन दादा कोल्हे यांचे आभार मानले.





