जि. प. व पं. स. सदस्यांनी मतदारांचा विश्वास सार्थ ठरवला –आ. आशुतोष काळे
Dist. W. And Pt. C. Members made the trust of the voters meaningful. MLA Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Fri 2July :17:40
कोपरगाव : वारी गट जिल्हा परिषद सदस्या सौ.सोनाली साबळे यांच्या जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या सेस फंडातून पात्र लाभार्थ्यांना २१ लाख १३ हजार रुपयांच्या साहित्याचे वाटप आ. आशुतोष काळे यांनी गुरुवारी पंचायत समिती कोपरगाव येथे केले. यावेळी ते म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून मतदारांचा विश्वास सार्थ ठरविला असल्याचे गौरवोद्गार व्यक्त केले.
आ. आशुतोष काळे म्हणाले , मागील चार वर्षाच्या कार्यकाळात ग्रामीण भागात शाळा खोल्या, अंगणवाडी इमारत, ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा योजना, मुस्लीम कब्रस्थान, स्मशानभूमी, समाज मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय आदि कोट्यावधीच्या निधीतून ग्रामीण भागातील विकासाचे प्रश्न मार्गी लावले आहेत. याकामी जिल्हा परिषद अध्यक्षा ना.सौ.राजश्री घुले यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी २० टक्के सेस फंडातून २०२०/२१ या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती,जमाती व इतर मागास प्रवर्गासाठी २५ कडबा कुट्टी मशीन, १६ इलेक्ट्रिक मोटार, ४५ शिलाई मशीन, एकूण ११ लाख ३१ हजार, तसेच ५ टक्के सेस फंडातून अपंग लाभार्थ्यांसाठी १४ दिव्यांग व्यक्तींना पिठ गिरणी प्रत्येकी १३,०००/- याप्रमाणे १ लाख ८१ हजार , लघु उद्योगासाठी १० व्यक्तींना प्रोत्साहनपर अनुदान प्रत्येकी २०,०००/- एकूण २ लाख, औषध उपचारासाठी ११ व्यक्तींना प्रत्येकी २०,०००/- याप्रमाणे २ लाख २० हजार व बहु विकलांग व्यक्तींच्या ११ पालकांना प्रत्येकी २०,०००/- याप्रमाणे २ लाख २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य तसेच महिला बालकल्याण विभागांतर्गत ४५ विद्यार्थिनींना १ लाख ८० हजारांच्या सायकल वाटप, असे एकूण २१ लाख १३ हजार रुपयांचे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, सुधाकर रोहोम, जि. प.सदस्या सौ. सोनाली साबळे, पं. स. सदस्य श्रावण आसने, मधुकर टेके, दाणे पाटील, रोहिदास होन, राहुल रोहमारे, गोरक्षनाथ जामदार, दिलीप शिंदे, विठ्ठल जावळे, अविनाश निकम, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी व लाभार्थी उपस्थित होते.





